आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती मधील भाजपने तीन दिवसापूर्वी ९९ जणांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यामध्ये शहरातील कोथरूडमधून चंद्रकांत पाटील,पर्वती विधानसभा मतदार संघामधून माधुरी मिसाळ आणि शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातून सिद्धार्थ शिरोळे या तीन विधानसभा मतदार संघातील विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली होती.मात्र पुणे कॅन्टोन्मेंटचे आमदार सुनील कांबळे आणि खडकवासला मतदार संघाचे भीमराव तापकीर विद्यमान आमदारांच्या नावाची घोषणा झाली नाही. त्यामुळे त्या दोन्ही आमदाराचे टेंशन वाढले आहे. महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर केली नाही.तर दुसर्‍या बाजूला महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या देखील जागावाटपा बाबत बैठका सुरू आहेत.उद्या सायंकाळपर्यंत महायुती आणि महाविकास आघाडीमधील जागावाटपा बाबत चित्र स्पष्ट होईल,असे बोलले जात आहे.

हेही वाचा >>> पिंपरी : महाविकास आघाडीतील इच्छुकांची मुंबईत धाव; एकही उमेदवार जाहीर न झाल्याने धाकधूक

state government ordered repossession of 116 acres of land in Kandivali due to unauthorized commercial use
कांदिवली औद्योगिक वसाहतीचा ११६ एकर भूखंड परत घेण्याचे आदेश, उच्च न्यायालयाकडून तूर्त अंतरिम स्थगिती
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
mns mayuresh wanjale
“खडकवासलावर मनसेचा शंभर टक्के झेंडा फडकणार” मनसे उमेदवार मयुरेश वांजळेंचा विश्वास
puja khedkar father dilip khedkar affidevit
पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, पण प्रतिज्ञापत्रातील ‘या’ नोंदीमुळे अडचणीत येण्याची शक्यता!
After threat to UP CM Yogi Adityanath Mumbai Police received another threat message
योगींचा मृत्यू बाबा सिद्दीकीसारखा झाला, तर भारताची अवस्था हमास, इस्त्राईलसारखी आणखी एक धमकीचा संदेश
Karuna Sharma Cried
Karuna Sharma : उमेदवारी अर्ज बाद ठरल्याने ढसाढसा रडल्या करुणा शर्मा, धनंजय मुंडेंना म्हणाल्या, “तू राक्षस…”
What Poonam Mahajan Said About Pramod Mahajan?
Poonam Mahajan : “आजही आठवतं, वडिलांचं रक्त माझ्या हातांना लागलं होतं…”, पूनम महाजन प्रमोद महाजनांच्या आठवणींत भावूक
Maharashtra assembly election 2024 Sharad Pawar NCP releases fourth list of 7 candidates
Sharad Pawar NCP 4th Candidate List : मोठी बातमी! शरद पवारांच्या राष्ट्रवादीची चौथी यादी जाहीर; सात उमेदवारांची घोषणा, कोणाला कुठून मिळाली संधी?

पण त्याच दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे.त्यामध्ये हडपसर येथून शहर अध्यक्ष साईनाथ बाबर,कोथरूड येथून किशोर शिंदे आणि मनसेचे आमदार दिवंगत रमेश वांजळे यांचे चिरंजीव मयुरेश वांजळे यांना खडकवासला मतदार संघातून उमेदवारी दिली आहे.शहरातील आठ विधानसभा मतदार संघातून केवळ तीन उमेदवार सध्या तरी जाहीर केले आहेत.येत्या कालावधीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे किती उमेदवार जाहीर करतात हे पाहणे जरुरीचे ठरणार आहे.

हेही वाचा >>> पिंपरी विधानसभा: अजित पवारांचे विश्वासू आमदार अण्णा बनसोडेंना महायुतीमधून विरोध; १८ माजी नगरसेवकांचा ठराव

पुणे शहरातील मनसेच्या तीन उमेदवारांमध्ये मयूरेश वांजळे हे सर्वात तरुण उमेदवार ठरले आहेत.त्यांचे वडील आमदार रमेश वांजळे यांची ‘गोल्डमॅन’ म्हणून ओळख होती. २००९ मध्ये खडकवासला मतदारसंघातून ते मनसेच्या तिकिटावर निवडून आले होते. आमदार असताना त्यांनी मनसे स्टाइलने अनेक आंदोलने केली आणि विधिमंडळ देखील त्यांनी चांगलेच गाजवले होते.तर २०११ मध्ये रमेश वांजळे यांचे निधन झाले.तर

त्यांची कन्या सायली वांजळे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर २०१७ ते २०२२ दरम्यान नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या.          तसेच हडपसर विधानसभा मतदार संघातून मनसेचे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कोंढवा भागातून २०१७ ते २०२२ पर्यंत आणि त्यांची पत्नी २०१२ ते २०१७ दरम्यान नगरसेविका राहिल्या आहेत.त्याचबरोबर अॅड किशोर शिंदे हे दोन वेळेस नगरसेवक आणि तीन वेळा कोथरूड येथून विधानसभा निवडणुक लढवली आहे.त्या तीन निवडणुकीत अगदी थोड्या मतांनी त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

Story img Loader