शाळांच्या आवारात होणारे गैरप्रकार व रोडरोमियोंच्या उच्छादास आळा बसावा म्हणून प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी मनसेने आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात, सातत्याने पाठपुरावा करूनही अधिकारी चालढकल करत असल्याचा आरोपही मनसेने केला आहे.
मनसेने १८ जानेवारी २०१३ ला याबाबतचे निवेदन दिले होते. तथापि, पालिकेच्या अ, ब आणि क प्रभागांकडे तरतूद नाही, असे कारण अधिकारी देत आहेत. ड प्रभागाने यासंदर्भात बैठक घेतली, तेव्हा हद्दीतील शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे नियोजन करून शाळेची यादी करण्याचा निर्णय झाला होता. मात्र, पुढे काहीच झाले नाही. या पाश्र्वभूमीवर निष्क्रिय ठरलेल्या शिक्षण मंडळावर व कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी रूपेश पटेकर यांनी आयुक्तांकडे केली आहे. प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही लावल्यास अनेक गैरप्रकारांना तसेच संभाव्य वाईट घटनांना आळा बसू शकेल, असे पटेकर यांनी म्हटले आहे.
शाळांच्या प्रवेशद्वारांवर सीसीटीव्ही बसवा – मनसे
शाळांच्या आवारात होणारे गैरप्रकार व रोडरोमियोंच्या उच्छादास आळा बसावा म्हणून प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी मनसेने आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्याकडे केली आहे.
First published on: 07-08-2013 at 02:37 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns demands cctv camera for each school entrance