महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे सध्या पक्ष बांधणी आणि निवडणुकांच्या तयारीसाठी दौरे करत असतानाच मनसेला पुण्यातून मोठा झटका बसला आहे. राज ठाकरे पुण्यात पोहचत असतानाच मनसेच्या पुण्यातील महिला नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राज ठाकरे यांना याबाबत लिहिलेल्या पत्रात त्यांनी दिलेल्या बळ आणि प्रेरणेसाठी आभारही मानलेत. तसेच राज ठाकरे हे नाव कायम ह्रदयात कोरलेलं राहिल, असंही नमूद केलंय. त्यांच्या राजीनाम्यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

रुपाली पाटील यांनी राजीनाम्यात काय म्हटलं?

रुपाली पाटील यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटलं, “सप्रेम जय महाराष्ट्र, मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे. आपण दिलेलं बळ नेहमी संघर्ष करण्याची प्रेरणा देत. यापुढेही आपले आशीर्वाद आणि मा.”श्री.राज ठाकरे” हे नाव ह्रदयात कोरलेले कायम राहिल. जय महाराष्ट्र.”

What Uddhav Thackeray Said About Raj Thackeray ?
Uddhav Thackeray : “राज ठाकरेंशी युती करणं शक्यच नाही, महाराष्ट्र द्रोही..”, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
raj thackeray maharashtra vidhan sabha election 2024 (1)
Raj Thackeray: “निकालांनंतर महाराष्ट्रात सरप्राईज मिळतील”, राज ठाकरेंचं सूचक विधान; नेमकं राज्यात काय घडणार आहे?
Raj Thackeray On Ramesh Wanjale
Raj Thackeray : “रमेश वांजळे शेवटचं माझ्याशी बोलले”, राज ठाकरेंनी सांगितली आठवण; म्हणाले, “अनेक जण सोडून गेले, पण…”
Raj Thackeray Criticized Sharad Pawar Again
Raj Thackeray : राज ठाकरेंची बोचरी टीका, “शरद पवार हे तालुक्याचे नेते, जाणते राजे वगैरे..”
What Raj Thackeray Said?
Raj Thackeray : राज ठाकरेंची बोचरी टीका, “उद्धव ठाकरेंकडून बाण गेला आणि फक्त खान राहिले आहेत, कारण..”
vijay salvi
कल्याणमधील ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवी यांचा राजीनामा

रुपाली पाटील कोणत्या पक्षात जाणार? चर्चांना उधाण

दरम्यान, रुपाली पाटील यांचा मनसे पक्षांर्गत बऱ्याच दिवसांपासून संघर्ष सुरू असल्याचंही बोललं जातंय. त्यामुळेच अखेर त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला. आता त्या कोणत्या पक्षात जाणार याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. सध्या रुपाली पाटील ठोंबरे शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात असं बोललं जात आहे. रुपाली पाटलांकडूनही लवकरच नव्या पक्षाची घोषणा करू असं सांगितलं जात आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा पुणे दौरा

दरम्यान, राज ठाकरे यांचा १५ डिसेंबरला पुणे दौरा आहे. ते बुधवारी सकाळी ८ वाजता सुरुवातीला शिवाजीनगर येथील रोकडोबा मंदीर येथे एका पदाधिकाऱ्याच्या घरी जाऊन भेट घेणार आहेत. यानंतर सकाळी ९ ते ११ वाजेदरम्यान छत्रपती शिवाजीनगर मतदार संघात असतील. यानंतर ते बॅकवेट हॉल, झाशीची राणी चौक बालगंधर्व येथे दुपारी १२ ते २ या वेळेत असतील. कोथरूड मतदारसंघात सायंकाळी साडेचार ते साडेपाच या वेळेत ते रत्ना बॅक्वेट हॉल (कर्वेनगर) येथे असतील.

सायंकाळी ६ ते साडेसात या वेळेत राज ठाकरे खडकवासला मतदारसंघात धायरेश्वर हॉल (धायरी) येथे असतील. हडपसर मतदार संघात ते राज बॅक्वेट हॉल (कोंढवा गाव) येथे राहतील.

हेही वाचा : ठाकरे सरकार पडणार का? मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणतात…

राज ठाकरेंचा दुसर्‍या दिवशीचा (१६ डिसेंबर) पुणे दौरा

राज ठाकरे शुक्रवारी (१६ डिसेंबर) सकाळी ९ ते ११ या वेळेत कसबा मतदार संघातील केसरीवाडा येथे असतील. नारायण पेठ १२ ते २, पर्वती मतदारसंघात एकनाथ सभागृह (बिबवेवाडी) येथे सायंकाळी ४ ते साडेपाच, कॅन्टोन्मेंट मतदार संघात नंदी कॉल मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर (ताडीवाला रोड) सायंकाळी ६ ते साडेसात या वेळेत असतील. याशिवाय वडगाव शेरी मतदारसंघात सरगम हॉटेल (गुंजन टॉकीजजवळ, नगर रोड, येरवडा) येथेही ते जातील.