पुणे : सकाळी जीमला जात असताना अचानक समोर तीन महिला हातात काेयता घेतलेल्या दिसल्या. मनात आले की इतेक आमचे पुणे असुरक्षित झाले का ? या वसंत मोरे यांच्या फेसबुक पोस्टची सध्या सोशल मिडियाच जोरदार चर्चा झाली आहे. महिलांच्या हाती असलेल्या कोयत्याचे रहस्यही त्यांनी पोस्टच्या माध्यमातून उलगडले आहे.

हेही वाचा >>> बंडखोरी का केली? तुमचा अजेंडा काय ते जनतेसमोर येऊन सांगा; राष्ट्रवादीच्या आमदाराचे राहुल कलाटे यांना आव्हान

Sharad Pawar Campaign, Wai-Khandala-Mahabaleshwar,
‘लाडक्या बहिणी’पेक्षा महिलांना संरक्षण हवे – शरद पवार
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
disha patani father Jagdish Singh patani
अभिनेत्री दिशा पटानीच्या वडिलांची फसवणूक; बढती देण्याचं आमिष दाखवत २५ लाख लुबाडले
Maharashtra government schemes for women,
लाडक्या बहिणींनो, कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!
old womans dead body found in Mutha river police investigation underway
पुणे : मुठा नदी पात्रात ज्येष्ठ महिलेचा मृतदेह, पोलिसांकडून तपास सुरू
woman voters chatura article
तू मात्र या फुकट योजनांच्या अमिषाला बळी पडू नकोस…
government that gives Rs 1500 as ladaki bahin is not doing favour to women
‘लाडक्या बहिणींनो’ कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!

या फेसबुक पोस्टमध्ये वसंत मोरे म्हणतात की, सकाळी जीमला जात असताना अचाकन समोर तीन महिला हातात कोयता घेतलेल्या दिसल्या. मनात आले की, इतेक आमचे पुणे असुरक्षित झाले का ?, की माॅर्निंग वाॅकला जाणाऱ्या महिला कोयदे घेऊन फिरू लागल्या आहेत. मी थोडा त्यांच्या मागे गेलो, तर त्या जनावरांसाठी चारा गोळा करत होत्या. पण, मागील आठवड्यात आमच्या कात्रज गावठाणमद्ये सकाळी सहा वाजता भर रस्त्यावर एका महिलेचे मंगळसूत्र चोरून चोरट्याने चक्क पळ काढला. जर पोलिसांनी चोरट्यांवर कडक कारवाई केली नाही, तर महिलांच्या हाती कोयता असलेले चित्र दिसले तर नवल वाटून घेऊ नका.