पुणे : आमच्या आरपीआय पक्षाने सगळ्या पक्षांना ताकत दिली आहे. माझी पार्टी मोठी नाही. पण आम्ही दुसऱ्या पक्षाला भक्कम बनवत आहे. अगोदर काँग्रेस राष्ट्रवादी सोबत होतो. त्यांना ताकद दिली. आता भाजप सोबत आहे आता भाजपला ताकद दिली आहे. राज्यात सध्या महायुतीच सरकार आले आहे. यात आम्हाला 1 मंत्रिपद मिळावे आणि १२ आमदारांमध्ये एक जागा आम्हाला मिळावी अशी मागणी आमची आहे. मुंबई महापालिका आम्ही जिंकणारच, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सत्तेच्या बाहेर करणार आहोत. मुंबई महानगर पालिकेच्या आगमी निवडणुकीसाठी भाजपप्रणीत महायुतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची काहीही गरज नाही. भाजपने महायुतीत मनसेला घेऊ नये, अशी आमची स्पष्ट मागणी आहे. तरीही महायुतीत मनसेला घेतल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय आठवले गट) वेगळी भूमिका घेईल, असा इशारा आरपीआयचे नेते, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा