पुणे : ‘हर हर महादेव’ चित्रपटावरून मुंबईप्रमाणेच पुण्यातही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. शहरातील बंद करण्यात आलेले ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचे खेळ मनसेकडून सुरू करण्यात आले. मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, राज्य सरचिटणीस अजय शिंदे, बाबू वागसकर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी कोथरूड सिटी प्राईडमध्ये कार्यकर्त्यांसह दाखल होत चित्रपटाचा खेळ सुरू केला.

शहरातील प्रत्येक सिनेमागृहात चित्रपटाचा खेळ सुरू राहणार असून, प्रेक्षकांनी येऊन हा चित्रपट पहावा.प्रेक्षकांना मारहाण किंवा त्रास दिला, तर मनसे शांत बसणार नाही, असा इशारा साईनाथ बाबर यांनी दिला. मनसेे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आवाज असल्याने या चित्रपटाला विरोध केला जात आहे, असा आरोप यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी केला. कोथरूड सिटीप्राईडमध्ये मनसे पदाधिका-यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.’हर हर महादेव’ चित्रपटावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेत वाद सुरू झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुंबईतील चित्रपटाचे खेळ बंद करण्यात आले होते. चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांना मारहाण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला होता. त्याविरोधात मनसेकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे.

हेही वाचा : डाॅ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण; न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेतील अधिकाऱ्याची उलटतपासणी

हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे यांना विरोध करण्यासाठी जर कोणी चित्रपट बंद करण्याचा प्रयत्न करणार असेल तर खळखट्याक होणारच ..! पुण्यात बंद केलेले हर हर महादेव चित्रपटाचे शो आज दुपार पासून मनसे पुन्हा चालू करत आहे – अजय शिंदे ,मनसे प्रदेश सरचिटणीस