पुणे: पुणे शहरातील कात्रज भागातील सुखसागरनगर येथील हभप पुंडलिक टिळेकर मैदान सुरू झालेच पाहिजे,या मागणीसाठी मनसे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिकेमध्ये क्रिकेट खेळून आंदोलन करण्यात आले.यावेळी महापालिका प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी मनसे पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर म्हणाले, पुणे शहरातील नागरिकांना सकाळच्या वेळेत व्यायाम करण्यासाठी,तर लहान मुलांना खेळण्यासाठी बर्याच ठिकाणी मैदान नाही.तर ज्या ठिकाणी मैदान उपलब्ध आहेत,त्या ठिकाणी टवाळखोर मुलांकडून चुकीच्या कामासाठी तेथील मैदानाचा वापर केला जात असल्याचे समोर येत आहे.त्यावर पोलीस आणि महापालिका प्रशासनाने मार्फत कोणत्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नाही.तर दुसर्या बाजूला कात्रज भागातील सुखसागरनगर येथील हभप पुंडलिक टिळेकर मैदान वापराविना पडून आहे.ते मैदान लहान मुलांसाठी, नागरिकांसाठी सुरू करण्यात यावे,या मागणीसाठी आम्ही आज पुणे महानगरपालिकेच्या आवारात येऊन क्रिकेट खेळून मागणी करित आहोत आणि दुसर्या बाजूला महापालिकेच्या नियोजन शून्य तसेच ते पुढे म्हणाले, येत्या आठ दिवसात मैदान सुरू न झाल्यास आम्ही महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांच्या दालनात क्रिकेट खेळू असा इशारा देखील यावेळी त्यांनी दिला.