पुणे : जागतिक व्यंगचित्र दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सव २०२३ चे उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. राज ठाकरे यांनी सर्व व्यंगचित्र पाहून कलाकार मंडळींचे कौतुक केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी राज ठाकरे यांच्याकडे व्यंगचित्र काढण्याचा आग्रह केला.
गेले दोन चार दिवस जे काही चालले आहे. ते पाहून अजित पवार यांचे चित्र काढण्याचा प्रयत्न करतो. मला ते कितपत येईल ते माहिती नाही, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थितांना सांगितले. त्यानंतर केवळ तीन मिनिटांत राज ठाकरे यांनी अजित पवार यांचे व्यंगचित्र काढले आणि ते पूर्ण होताच आता पुढे काय लिहू, “आता गप्पा बसा”, असे राज ठाकरे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांची काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
उद्घाटनाला कार्टुन्सट कम्बाईनचे अध्यक्ष संजय मिस्त्री, युवा संवाद सामाजिक संस्थेचे अध्यक्ष धनराज गरड उपस्थित होते.