महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुण्यात तब्बल दहा वर्षानंतर बुधवारी (दि. २८) जाहीर व्याख्यान होणार आहे. दहा वर्षांपूर्वी त्यांचे फर्ग्युसन महाविद्यालयात व्याख्यान झाले होते. त्यामुळे या व्याख्यानामध्ये राज ठाकरे ‘नवं काही तरी’ बोलणार, का राजकीय परिस्थितीवर भाष्य करणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- सीबीएसई दहावी, बारावीची २ जानेवारीपासून प्रात्यक्षिक परीक्षा

राज ठाकरे मंगळवारपासून दोन दिवसांच्या पुणे दाैऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात बुधवारी (२८ डिसेंबर) ते सहजीवन व्याख्यानमालेत ‘नवं काही तरी’ या विषयावर संवाद साधणार आहेत. सहकारनगर येथील मुक्तांगण बालरंजन केंद्र येथे सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

हेही वाचा- रुपाली पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसकडून कान उघाडणी

राज ठाकरे यांनी २०१९ मधील विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी त्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात पुण्यात एकच सभा घेतली होती. त्यानंतर त्यांचे पुणेकरांसाठी जाहीर भाषण झालेले नाही. मनसेच्या वर्धापनदिनाच्या ९ मार्च २०२२ मधील मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून भाषण केले होते. राज ठाकरे यांचे मेळाव्यातून किंवा पक्षाच्या जाहीर सभांतून भाषणे झाली असली तरी ती राजकीय स्वरूपाची होती. दहा वर्षांपूर्वी फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांनी संवाद साधला होता. त्यामुळे या व्याख्यानामध्ये राज ठाकरे काय बोलणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
महापालिकेची निवडणूक येत्या काही महिन्यात होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या दृष्टीने पुण्याकडे राज ठाकरे यांनी लक्ष केंद्रित केले आहे. संघटनात्मक बैठका, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका, मेळावे, जाहीर सभांच्या माध्यमातून राज ठाकरे राजकीय टीकाही करत आहेत. मात्र ‘नवं काही तरी’ या विषयावर राज ठाकरे राजकीय भाष्य करणार का, याबाबतही उत्सुकता आहे.