महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सभासद नोंदणी मोहिमेला सुरुवात झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते या मोहिमेला सुरुवात झाली असून, नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. राज ठाकरे पुण्यात पोहोचल्यानंतर नवी पेठेतील शहर कार्यालयास भेट दिली. ढोल ताशांच्या गजरात राज ठाकरे यांच स्वागत कऱण्यात आलं. यानंतर सर्वात प्रथम राज ठाकरेंची सदस्य म्हणून नोंदणी करत मोहिमेला सुरुवात करण्यात आली. यावेळी राज ठाकरेंनी मिश्किलपणे आपल्याला सदस्य करुन घेतल्याबद्दल पक्षाचे आभार मानले. तसंच महाराष्ट्रातील नागरिकांना सभासद होण्यासाठी आवाहन केलं.

मनसेच्या सभासद नोंदणीसाठी सकाळपासूनच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पुण्यातील पक्षाच्या कार्यालयाबाहेर गर्दी केली होती. राज ठाकरे पोहोचल्यानंतर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यानंतर राज ठाकरेंच्या हस्ते मोबाइलवरुन सदस्य नोंदणी करत मोहिमेला सुरुवात करण्यात आली. राज ठाकरेंनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना महाराष्ट्रातील सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावं यासाठी आवाहन केलं.

राज ठाकरे काय म्हणाले –

“आजपासून मनसेची सभासद नोंदणी सुरु होत आहे. आजपर्यंत मुंबईत ही नोंदणी झाली आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, दर तीन ते चार वर्षांनी प्रत्येक पक्षाला नव्याने नोंदणी करावी लागते. याआधीची नोंदणी लॉकडाउनच्या आधी झाली होती. त्यामुळे आता नव्याने नोंदणी पुन्हा सुरु होत आहे. माझी महाराष्ट्रातील तमाम माता, भगिनी आणि बांधवांना मनसेचे सदस्य व्हावं अशी विनंती आहे,” असं आवाहन राज ठाकरेंनी केलं.

पाहा व्हिडीओ –

“यावेळी जे सदस्य होतील त्यांना पक्षाकडून दर आठवड्याला मोबाइलवर संदेश पाठवला जाईल. त्यात माझी भाषणं, महाराष्ट्रासंबंधी इतर काही विषय असतील. त्याची नोंदणी आजपासून सुरु होत आहे. सर्वात प्रथम माझी नोंदणी झाली आहे. मला सदस्य करुन घेतल्याबद्दल मी मनसेचे आभार मानतो,” असं मिश्कील भाष्यही यावेळी त्यांनी केलं.

Story img Loader