पुणे :पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे हे मागील काही दिवसांपासून सतत चर्चेत असतात.आता पुन्हा चर्चेत आले असून वसंत मोरे यांनी भाजपचे नेते माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या संपर्क कार्यालयास भेट दिली.त्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच, वसंत मोरे भाजपात जाणार का या चर्चाना उधाण आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्याबाबत आज प्रसार माध्यमांशी संवाद साधताना, वसंत मोरे म्हणाले की,मुरलीधर मोहोळ आणि माझी मागील जवळपास १५ वर्षापासून ओळख आहे. आमच्यात चांगली मैत्री असून आमच्या दोघांची एका कार्यक्रमानिमित्त भेट झाली.त्यानंतर मी त्यांच्या ऑफिसला भेट दिली.ते ऑफिस हायटेक असुन मला वाटल,भाजप शहराध्यक्ष कार्यालय आहे. कारण त्या ऑफिस मध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना बाबत माहिती देणारे विविध विभाग होते.ऑफिस खूप चांगल्या प्रकारे उभारले गेले असल्याचे त्यांनी कौतुक केले.तर मला देखील शहर कार्यालय करायचे होते. त्या दृष्टीने प्रयत्न देखील करीत होतो.पण ते राहून गेल्याची खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली.

तुमच्या या भेटीमुळे भाजपात जाणार असल्याचे विचारताच ते म्हणाले की, माझा प्रवास राज मार्गावरच असून माझा प्रवास बदललेला नाही.मी बदलू शकत देखील नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

आज गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही गुरूकडे काय मागितल.त्यावर ते म्हणाले की,आज काही गुरूंची भेट झालेली नाही.गुरूंची तब्येत व्यवस्थित नाही.परंतु माझं कायम मागण आणि म्हणण एकच आहे की,पुणे शहराचा महापौर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच झाला पाहिजे.अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.