लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : पर्वती दर्शन परिसरात टोळक्याने दहशत माजवून वाहनांची तोडफोड केली. टोळक्याने एका अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार केले. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, दोन्ही गटातील बाराजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
white giant squirrel spotted in mahabaleshwar
Video : महाबळेश्वरमध्ये पांढऱ्या शेकरूचे दर्शन !
Attempted murder of laborer due to argument over drinking
दारू पिताना झालेल्या वादातून मजुराचा खुनाचा प्रयत्न, भिडे पूल परिसरातील घटना
pune police arrested three for stealing mobile phones
मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड
Loksatta anvyarth Confusion in Assembly session after Jammu and Kashmir became Union Territory
अन्वयार्थ: काश्मिरी राजकारणाचा बदलता ‘दर्जा’
Jammu Kashmir Assembly Chaos
Chaos in J&K Assembly : जम्मू काश्मीरच्या विधानसभेत आमदार भिडले; कलम ३७० च्या मुद्द्यावरून सभागृहात घमासान!

याबाबत सीता नितीन शेंडगे (वय ३३, रा. शिवराज मित्र मंडळाजवळ, पर्वती दर्शन) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अल्पवयीन मुलासह श्री देवेंद्र, अजय चव्हाण, सोन्या गेजगे, शुभम अडागळे याच्यासह सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलाचा शेंडगे यांचा पुतण्या अथर्व याच्याशी वाद झाला होता. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास अल्पवयीन मुलगा देवेंद्र, चव्हाण, अडागळे आणि साथीदार शिवराज मित्र मंडळाजवळ आले. त्यांनी कोयते उगारून दहशत माजविली. अथर्व याच्या डोक्यावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. अथर्वने वार चुकविला. घराच्या दरवाजावर कोयता आपटून आरोपींनी शिवीगाळ केली. परिसरातील दुचाकी, टेम्पो, रिक्षांच्या काचा फोडल्या, तसेच बिअरची बाटली रस्त्यात फोडली, असे शेडगे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक मुळीक तपास करत आहेत.

आणखी वाचा-शरद मोहोळ खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार गणेश मारणेला अटकपूर्व जामीन मिळणार का?

अल्पवयीन मुलाला बांबूने बेदम मारहाण केल्याप्रकरणी परस्परविरोधी तक्रार पर्वती पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. याबाबत अल्पवयीन मुलाने फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, अथर्व प्रदीप शेंडगे (वय १९), निलेश अशोक चंदनशिवे, राजरतन सुनील गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे. त्यांचे साथीदार कृष्णा देवेंद्र, आफन शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक कांबळे तपास करत आहेत.