पुणे : भररस्त्यात टोळक्याकडून वाढदिवस साजरा करण्यात येत असताना किरकोळ वादातून दहशत माजविण्याची घटना उत्तमनगर आज भागात घडली. टोळक्याने कोयते नाचवत परिसरातील दुचाकी आणि मोटारींची तोडफोड केली. तसेच नागरिकांना शिवीगाळ करुन दहशत माजविली. या संदर्भात उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे.
हेही वाचा >>> सदाभाऊ खोत यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची गृहमंत्र्यांकडून पोलीस महासंचालकांना सूचना
या प्रकरणी सचिन दिलीप राठोड (वय २४, रा. कोंढवे धावडे) याला अटक करण्यात आली आहे. त्याचे साथीदार शुभम संदीप ठाकूर (वय १८), सोन्या खाडे, अक्षय राठोड तसेच साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहिम गणेश मौर्य (वय २०, रा. मोरे बिल्डींग, कोपरे गाव) याने या संदर्भात उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा >>> विधान परिषद निवडणूक: केंद्रीय तपास यंत्रणांकडून मविआच्या आमदारांना फोन, नाना पटोलेंचे गंभीर आरोप
दाखल फिर्यादीनुसार आरोपी शुभम ठाकूर यांचा कोंढवे धावडे परिसरातील शिवशक्ती चौकात वाढदिवस साजरा करण्यात येत होता. यावेळी आरोपीचा रोहीम मौर्य याच्याशी वाद झाला होता. ठाकूर यांचा वाढदिवस सुरू असताना टोळक्याने त्यांच्या हातातील कोयते नाचवून दहशत माजविण्यास सुरुवात केली.
हेही वाचा >>> मुख्यमंत्र्यांच्या नावाचे बनावट व्हॉटसॲप खाते; राजकीय व्यक्तींसोबत नागरिकांना मेसेज पाठवल्याने खळबळ
यावेळी टोळक्याने परिसरातील नागरिकांना शिवीगाळ करुन रस्त्याच्या कडेला लावलेल्या मोटारी तसेच दुचाकी वाहनांवर दगडफेक केली. पोलिसांनी या टोळक्याविरोधात दहशत माजविणे तसेच तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. सहायक निरीक्षक रोकडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.