मोबाईलमुळे भावनिकतेचा स्पर्श नात्यात उरला नाही, तसेच नात्यातील संवादही हरवला आहे. अर्धा तास मोबाईलची बॅटरी रिचार्ज नसेल तर आपण अस्वस्थ होतो, असे मत ‘पासवर्ड आनंदाचा’ फेम गणेश शिंदे यांनी व्यक्त केले.
आकुर्डीतील माऊली व्याख्यानमालेत ‘जगण्यात खरी मौज आहे’ या विषयावर ते बोलत होते. पं. राजू संवार यांच्या हस्ते व्याख्यानमालेचे उद्घाटन झाले. माजी नगरसेवक व्ही. एस. काळभोर, ऊर्मिला काळभोर, सूर्यकांत मुथीयान, मुख्य संयोजक धनंजय काळभोर आदी उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, आपण भौतिक सुखात अडकत चाललो असल्याने जीवनातील खरा आनंद बाजूला पडला आहे. आयुष्याचा शाश्वत आनंद घ्यायचा असेल तर अध्यात्माशिवाय पर्याय नाही. केवळ संघर्ष म्हणजे जगणे नव्हे तर आहे त्या परिस्थितीशी तडजोड करत आनंद शोधत जगणे होय. जीवनाचा आनंद घेताना दुसऱ्यांनादेखील सुखी ठेवण्याचा प्रयत्न करावा, असे ते म्हणाले. पं. संवार म्हणाले, जगण्यासाठी श्वासाइतकेच ज्ञानाला महत्त्व आहे. मात्र, या ज्ञानाला दिशा प्राप्त झाली पाहिजे. सूत्रसंचालन मनोज शेलोत यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा