पुणे : नवीन मुठा उजवा कालव्यातून होणारी पाणीचोरी रोखण्यासाठी खडकवासला ते इंदापूरपर्यंत कालव्याच्या दोन्ही बाजुला ५० मीटरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. याबाबतची विनंती जलसंपदा विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्याला मान्यता मिळाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खडकवासला धरण साखळीमध्ये गेल्या वर्षीपेक्षा सुमारे तीन अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाकडून धरणांमधील उपलब्ध पाण्याचे अत्यंत काटेकोर नियोजन करण्यात येत आहे. पुणे शहरासाठी पिण्याचे तसेच ग्रामीण भागात शेतीला सिंचनासाठी पुरेसे पाणी देण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. सध्या ग्रामीण भागासाठी नवीन मुठा कालव्यातून पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे कालवा भरून वाहत आहे. या कालव्यातून बेकायदा पाणी उपसा रोखण्यासाठी जलसंपद विभागाच्या खडकवाला प्रकल्पाच्या अधीक्षक अभियंता (प्रभारी ) सुनंदा जगताप, कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे विनंती केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी १४४ कलम लागू करण्याचे आदेश दिले आहेत.