महायुतीने पुण्याची जागा जिंकण्यासाठी त्यांचे सर्व ‘स्टार’ पुण्यात उतरवण्याचे प्रयत्न सुरू केले असून पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची एक सभा पुण्यात होणार आहे. प्रचाराची सांगता त्यांच्या सभेने व्हावी यासाठी पक्षाकडून सध्या मोर्चेबांधणी सुरू आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दीपक पायगुडे यांच्यासाठी राज ठाकरे यांनी तीन सभा दिल्या असून त्यातील एक सभा नदीपात्राच्या मैदानात होणार आहे.
शिरोळे यांच्या प्रचारासाठी खासदार नवज्योतसिंग सिद्धू, तसेच पक्षाचे प्रवक्ते मुक्तार अब्बास नकवी, स्मृती इराणी यांच्या सभा पुण्यात होणार आहेत. तसेच १० एप्रिलनंतर गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे यांच्याही सभांचे आयोजन पुण्यात होणार आहे. सुब्रमण्यम स्वामी यांना निमंत्रितांबरोबर वार्तालाप कार्यक्रमासाठी पुण्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. रामदेव बाबा यांनीही शिरोळे यांच्या प्रचारासाठी जाहीर सभेला येण्याचे मान्य केले आहे. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची सभा पुण्यात व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असून आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी तीन सभा पुण्यासाठी दिल्या आहेत.
राज ठाकरे ३१ ला पुण्यात
दीपक पायगुडे यांच्या प्रचारासाठी गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरे यांची जाहीर सभा नदीपात्रात सायंकाळी होईल. त्याच दिवशी त्यांनी आणखी दोन सभा पुण्याला दिल्या असून त्यांची ठिकाणे एक-दोन दिवसात जाहीर केली जाणार आहेत. शर्मिला ठाकरेही पुण्यात प्रचाराला येत असून त्यांचे रोड शो आयोजित करण्यात येत आहेत.
मोदींसह महायुती, मनसेचे ‘स्टार’ पुण्यात
महायुतीने पुण्याची जागा जिंकण्यासाठी नरेंद्र मोदी यांची एक सभा ,तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दीपक पायगुडे यांच्यासाठी राज ठाकरे यांनी तीन सभा दिल्या अाहेत.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 28-03-2014 at 03:20 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modi navjyotsing siddhu athawale in pune for canvassing