आइस्क्रीम म्हटलं की अनेक नावं डोळ्यापुढे येतात. पुण्यात तयार होणारेही काही आइस्क्रीमचे ब्रँड आहेत आणि आइस्क्रीमप्रेमी त्यांचा आस्वाद वर्षांनुवर्ष घेत आहेत. रविवार पेठेतलं ‘मोहन आइस्क्रीम’ हे असंच एक ठिकाण. इथे रस्त्यावर उभं राहून कुल्फी खाणं किंवा मिल्कशेक पिणं किंवा गुलकंद आइस्क्रीम खाणं हा खवय्यांचा अगदी ठरलेला कार्यक्रम.

उन्हाळ्याच्या तीव्र झळांमध्ये थंड पदार्थाचा आस्वाद आता अपरिहार्य ठरत आहे. उसाच्या रसापासून लस्सी किंवा ज्यूस अशा थंड पेयांपर्यंत आणि आइस्क्रीम पासून बर्फाच्या थंडगार गोळ्यापर्यंत जे जे म्हणून थंड पदार्थ आहेत, अशा पदार्थाचं खाणं-पिणं सध्या जोरात आहे. आइस्क्रीम म्हटलं की अनेक नामांकित ब्रँड सहजच आठवतात. त्या ब्रँडची अनेक दुकानंही पुण्यात आहेत आणि या मोठय़ा ब्रँड बरोबरच पुण्यातील काही नावांचीही आठवण चटकन होतेच. रविवार पेठेतलं ‘मोहन आइस्क्रिम’ हे असंच एक नाव. थोडी थोडकी नाही तर तब्बल सत्तर र्वष खंडेलवालांचं हे ‘मोहन आइस्क्रीम’ पुणेकरांच्या जिभेवर आहे. या आइस्क्रीमची आणि एकूणच या व्यवसायाची विविध वैशिष्टय़ं आहेतच; पण एक मुख्य वैशिष्टय़ं म्हणजे हा वर्षभर चालणार उद्योग-व्यवसाय आहे आणि ‘मोहन आइस्क्रीम’ या उद्योगाच्या तिन्ही ठिकाणची गर्दी बघितली की आपल्या लक्षात येतं, हे आइस्क्रीम किती लोकप्रिय आहे.

unseasonal rain, Vidarbha, temperature, rain ,
विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता! किमान तापमानात वाढ
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
seven ways to ensure you boost your water intake
Water Intake In Winter Season: हळदीच्या दुधात एक चिमूटभर काळी मिरी घातल्याने काय फायदा होतो? वाचा काय म्हणतात तज्ज्ञ
rain forecast for two days in vidarbha central maharashtra
विदर्भ, मध्य महाराष्ट्रात दोन दिवस पावसाचा अंदाज; जाणून घ्या, बंगालच्या उपसागरातील वाऱ्याच्या चक्रीय स्थितीचा परिणाम
in state increase demand of electricity in winter
ऐन हिवाळ्यात विजेची विक्रमी मागणी…असे काही घडले की ज्यामुळे….
la nina become active in the pacific ocean impact on kharif crop
ला निना सक्रिय… रब्बी पिकांना फायदा? पण परिणाम अल्पकालीनच?
health benefits of Tilache Laddoos
हिवाळ्यात भरपूर प्रमाणात तिळाचे लाडू का खावेत? वजन कमी करण्यापासून ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत तज्ज्ञांनी सांगितले फायदे
congress mla vijay wadettiwar criticize cm devendra fadnavis over crime increase in state
चंद्रपूर : वडेट्टीवार म्हणतात, ‘मुख्यमंत्री फडणवीसांचा धाक नाही, त्यामुळेच गुन्हेगारी…’

मोहनलाल खंडेलवाल यांनी सत्तर वर्षांपूर्वी अगदी छोटय़ा स्वरूपात हा व्यवसाय सुरू केला. ते मूळचे औरंगाबाद जिल्ह्य़ातील अजंठा या गावचे. ते आणि त्यांचे बंधू रामनारायण यांनी अगदी छोटय़ा हातगाडीवर म्हणा किंवा ढकलगाडीवर ‘मोहन आइस्क्रीम’चा प्रारंभ केला. अत्यंत कष्टातून त्यांनी हा व्यवसाय नावारूपाला आणला. या आइस्क्रमची खासियत ही, की हे आइस्क्रीम ‘पॉट आइस्क्रीम’ या स्वरूपातलं आहे. खंडेलवाल यांनी जेव्हा अगदी छोटय़ा स्वरूपात आइस्क्रीम तयार करून विक्रीला सुरुवात केली तेव्हाही ते ‘पॉट आइस्क्रीम’ याच स्वरूपात तयार व्हायचं आणि आजही तीच पद्धत त्यांच्या पुढच्या पिढीनं जपली आहे. ‘पॉट आइस्क्रीम’चं जे वेगळेपण आहे त्याचा अनुभव घ्यायचा असेल, तर हे आइस्क्रीम नक्कीच खायला हवं.

खंडेलवाल यांनी रविवार पेठेत बोहरी आळीच्या चौकात छोटी गाडी उभी करून आइस्क्रीम विक्रीला सुरुवात केली आणि लवकरच हे आइस्क्रीम खवय्यांच्या पसंतीला उतरलं. चंद्रकांत, सूर्यकांत आणि सोमनाथ या त्यांच्या पुढच्या पिढीनंही उत्तमरीत्या व्यवसाय सांभाळला आहे आणि विस्तारही केला आहे. जंगली महाराज रस्त्यावर संभाजी उद्यानासमोर आणि गंगाधाम चौकाजवळ ‘मोहन आइस्क्रीम’च्या शाखा काही वर्षांपूर्वी सुरू झाल्या. उत्तम चव आणि आइस्क्रीमचं वेगळेपण यामुळे या दोन्ही ठिकाणी आइस्क्रीमप्रेमींची गर्दी असते.

गुलकंद आइस्क्रीम, मिल्कशेक किंवा रबडी आणि कुल्फी हे ‘मोहन आइस्क्रीम’चे सर्वात लोकप्रिय प्रकार. हे तीनच प्रकार रविवार पेठेत मिळतात पण इतर दोन्ही दुकानांमध्ये मात्र या तीन प्रकारांबरोबरच वेगवेगळ्या स्वादातील अनेक प्रकारातील आइस्क्रीम मिळतात. त्यात मुख्यत: मलई, गुलकंद, केशर बदाम पिस्ता, अंजीर, कोकोनट, चिक्कू बदाम, पिस्ता, बटरस्कॉच, मँगो, सीताफळ, स्ट्रॉबेरी, काजू किसमिस, लिची, रोस्टेड पिस्ता असे वेगवेगळ्या प्रकारातील स्वाद उपलब्ध असतात. आइस्क्रीमचे हे सगळेच प्रकार पॉट आइस्क्रीमच्याच स्वरूपातील असतात. हे त्याचं वेगळेपण. या सगळ्या आइस्क्रीमच्या चवीत किंचिंतही कधी फरक होत नाही, हे विशेष. इतर कोणतंही आइस्क्रीम घेतलं तरी मोहन आइस्क्रीमकडे गेल्यानंतर गुलकंद आइस्क्रीम घ्यायचं हा अनेकांचा परिपाठच आहे. चंद्रकांत खंडेलवाल यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १९८८-८९ च्या सुमारास घरच्या या व्यवसायात वडिलांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला सुरुवात केली आणि व्यवसायाचे धडेही घेतले. नंतर सूर्यकांत, सोमनाथ हे बंधूही या व्यवसायात आले. इथल्या कुल्फीचं वर्णन करायचं तर दाट बासुंदी असंच करता येईल. ती फक्त काडीला लावलेली असते इतकंच. शिवाय, इथला मिल्कशेक हा देखील एक प्रसिद्ध पदार्थ. तो ग्लासामध्ये दिला जात असला तरी एक प्रकारची ती घट्ट रबडीच असते. गुलकंद आइस्क्रीम बरोबरच हा मिल्कशेक आवर्जून घेतला जातो. व्यवसायाचा व्याप वाढला असला आणि मागणीही खूप असली तरी वडिलांनी घालून दिलेली जी आइस्क्रीम बनवण्याची पद्धत आहे तीच त्यांची पुढची पिढी सांभाळत आहे. त्यामुळे मशिनवर आइस्क्रीम तयार करण्याची पद्धत अद्यापही नाही. फक्त मोठय़ा प्रमाणावर आइस्क्रीम लागत असल्यामुळे ते पॉट स्वरूपात म्हणजे फक्त इलेक्ट्रिक मोटार लावून तयार केलं जातं. आइस्क्रीम करण्याची पद्धत ठरलेली असल्यामुळे आणि तयार होणाऱ्या मालाच्या दर्जात अजिबात कुठे तडजोड करायची नाही हे पक्कं असल्यामुळे इथली चव वर्षांनुवर्ष खवय्यांच्या जिभेवर आहे.

कुठे आहे?

  • बोहरी आळी, रविवार पेठ संभाजी उद्यानासमोर गंगाधाम चौक, बिबवेवाडी

Story img Loader