महाराष्ट्र हरिजन सेवक संघाच्या अध्यक्षपदी माजी आमदार मोहन जोशी यांची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबरीने जोशी यांना केंद्रीय कार्यकारिणीवर विशेष आमंत्रित म्हणून मानाचे स्थान देण्यात आले आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी अस्पृश्यता निवारण आणि दलितोद्धाराच्या उद्देशाने १९३२ मध्ये स्थापन केलेल्या हरिजन सेवक संघाच्या केंद्रीय समितीची नुकतीच दिल्ली येथे सभा झाली. या सभेमध्ये मोहन जोशी यांनी महाराष्ट्र हरिजन सेवक संघाचे अध्यक्ष म्हणून राज्यामध्ये केलेल्या कामाची दखल घेऊन पुढील पाच वर्षांसाठी त्यांची अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. तसेच जोशी यांना केंद्रीय कार्यकारिणीवर विशेष आमंत्रित म्हणून मानाचे स्थान देण्यात आले आहे. संघाचे केंद्रीय अध्यक्ष संकर कुमार सन्याल यांनी संघाच्या महाराष्ट्र शाखेला पत्र पाठवून हा निर्णय कळविला आहे. राज्यामध्ये गांधीजींच्या विचारसरणीने काम करणाऱ्या संस्थांशी संवाद आणि संपर्क करून गांधी विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी जोमाने काम करण्याचा मनोदय मोहन जोशी यांनी व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा