पुण्यात १२ वर्षीय अल्पवयीन मुलीसमोर हस्थमैथुन करणाऱ्या विक्षिप्त रिक्षा चालकाला हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. सचिन देविदास शेंडगे (वय ३३) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने रिक्षा ओळखू येऊ नये म्हणून रिक्षाच्या समोर रेडियम ने नाव काढले होते. परंतु, सीसीटीव्हीच्या आधारे हिंजवडी पोलिसांना आरोपीला पकडण्यात यश आलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (२२ एप्रिल) दुपारी तीनच्या सुमारास अल्पवयीन १२ वर्षीय मुलगी क्लास करून घरी चालली होती. तेव्हाच, रिक्षा चालक सचिन हा मुलगी येत असलेल्या रस्त्यावर विरुद्ध दिशेने आला. मुलीला पत्ता विचारण्याचा बहना करून तिच्या समोरच हस्तमैथुन केले. या घटनेमुळे पीडित मुलगी घाबरली. पीडित मुलीने घरी गेल्यानंतर हा सर्व प्रकार पालकांना सांगितला.

या प्रकरणी हिंजवडी पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी दोन टीम तयार केल्या. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. आरोपी हा दापोडी येथील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. रिक्षात बदल आढळून आला, पण आरोपी तोच असल्याचं सांगण्यात आलं. आरोपीला हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

या प्रकरणी आरोपी विरोधात विनयभंग, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम सन २०१२ कलम १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सागर काटे आणि राम गोमरे यांनी ही कामगिरी केली. 

Story img Loader