पुणे : नामांकित रुग्णालयात प्रसूत झालेल्या महिलेचा रुग्णालयातील कर्मचाऱ्याने विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कर्मचाऱ्याच्या विरोधात कोरेगाव पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी पांडुरंग येडगे (वय ३७) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुणे स्टेशन परिसरातील एका नामांकित रुग्णालयात महिला प्रसूत झाली. महिला रुग्णालयातील कक्षात होती. त्या वेळी येडगेने कक्षातील पडदा सरकवून डोकावून पाहिले. येडगे एकटक डोकावून पाहत असल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने त्वरित रुग्णालयातील प्रशासनाला याबाबतची माहिती दिली. येडगे रुग्णालयात पर्यवेक्षक असून त्याच्या विरोधात विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक कुलकर्णी तपास करत आहेत.

Story img Loader