पुण्यातील भोसरी एमआयडीसीमध्ये (MIDC) एका कंपनीत महिलेचा विनयभंग केल्याची घटना समोर आलीय. मंगळवारी (२९ मार्च) सायंकाळी नवनाथ शेटे नावाच्या व्यक्तीने महिलेचा टी शर्ट ओढत विनयभंग केल्याची पोलीस तक्रार दाखल करण्यात आलीय. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याशिवाय पीडित महिलेने आपल्या मोबाईलमध्ये देखील या प्रकाराचा व्हिडिओ रेकॉर्ड केलाय. या प्रकरणी अधिक तपास भोसरी एमआयडीसी पोलीस करत आहेत.
या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी नवनाथ शेटे पीडित महिलेच्या पतीला मारहाणीसाठी अंगावर धावून जाताना दिसत आहे. यावेळी महिलेने याला विरोध केल्यानंतर आरोपीने महिलेचा टी-शर्ट धरून ढकलल्याचं दिसत आहे.
हेही वाचा : डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्यात विनयभंगातील आरोपीचा मृत्यू, पोलीस म्हणाले…
पीडित महिलेने रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओत काही संभाषण ऐकायला येत आहे. यानुसार आरोपी तक्रारदार महिलेच्या पतीकडे घेतलेले पैसे मागताना दिसत आहे. यावर पीडित महिला आरोपीला पहिलवानकीचा धाक दाखवत बोलत असल्याचा आरोप करते. तसेच पोलीस तक्रार देण्यासाठी एमआयडीसी शॉपमधून बाहेर पडते. मात्र, तेथेच आरोपी आणि पीडित महिलेच्या पतीमध्ये धक्काबुक्की होते.