महिलेला अश्लील भाषेत टपालाने पत्र पाठवून तिचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पत्र पाठविणाऱ्या अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तक्रारदार महिलेने या संदर्भात दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला पर्वती भागात राहायला आहे. तक्रारदार महिलेला गेल्या काही दिवसांपासून अश्लील भाषेत टपालाने पत्रे पाठविण्यात येत होती.

पुणे : २०१४ ला कोणी दगा फटका केला हे १२ कोटी जनतेला माहिती ; बावनकुळेंचा ठाकरेंना टोला

सुरुवातीला महिलेने पत्रांकडे दुर्लक्ष केले. त्यानंतरही महिलेला पत्र पाठविण्याचे प्रकार सुरू राहिल्याने तिने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. महिलेला अश्लील भाषेत पत्र पाठविणाऱ्या अज्ञाताच्या विरोधात विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्र पाठविणाऱ्याचा शोध घेण्यात येत असून पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.

Story img Loader