पुणे : महाविद्यालयीन युवकाला धमकावून त्याच्याकडून अडीच लाख रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी एका युवकाविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

प्रितेश सोंडकर असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. या बाबत एरंडवणे भागातील एका व्यावसायिकाने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदाराचा मार्केट यार्ड भागात व्यवसाय आहे. मार्च महिन्यात करभरणा करायचा असल्याने त्यांनी कुटुंबीयांच्या खात्यातील व्यवहाराची माहिती घेतली. तेव्हा व्यावसायिकाच्या मुलाच्या खात्यातून ऑनलाइन पद्धतीने दीड लाख रुपये आणि त्यानंतर चार वेळा प्रत्येकी २५ हजार रुपये वेगवेगळ्या क्रमांकावर पाठविण्यात आल्याचे लक्षात आले.

scammer pretending to be police officer calls real cop
‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’, सायबर चोरट्याचा पोलिसाला गंडा घालण्याचा प्रयत्न; नंतर झालं असं काही
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Attack on police officer on patrol
मुंबई : गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला
Fraud with Sarafa by pretending to be policeman Steal gold chain
पोलीस असल्याच्या बतावणीने सराफाची फसवणूक; सोनसाखळी चोरून चोरटा पसार
Dhankawadi gambling den, Raid on gambling den,
पुणे : धनकवडीत जुगार अड्ड्यावर छापा; दहाजणांविरुद्ध गुन्हा
Malvan Shivputla accident case Hearing on bail plea of ​​Jaideep Apte Chetan Patil in High Court Mumbai news
मालवण शिवपुतळा दुर्घटना प्रकरण: जयदीप आपटे, चेतन पाटीलच्या जामीन याचिकेवर उच्च न्यायालयातच सुनावणी
Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले

हेही वाचा – अकोला : धमकी देत तरुण म्हणाला, “मला तुझ्याशी लग्न करायचं आहे”; पुढे झाले असे की..

व्यावसायिकाने या बाबत मुलाकडे विचारणा केली. तेव्हा त्याने एका युवकाने धमकावून अडीच लाख घेतल्याचे वडिलांना सांगितले. वडिलांनी मुलाची चौकशी केली. पैसे का पाठविले, अशी विचारणा केली. तेव्हा ऑक्टाेबर महिन्यात प्रितेश सोंडकर नावाच्या तरुणाने समाजमाध्यमावर मैत्रीची विनंती पाठविली होती. त्याने मैत्रीची विनंती स्विकारली. त्यानंतर स्नेहल गुरव या युवतीच्या नावे मुलाला संदेश पाठविण्यास सुरुवात झाली. त्यानंतर सोंडकरने समाजमाध्यमातील संवादाचा स्क्रीनशाॅट तुझ्या वडिलांना पाठवितो, असे सांगून महाविद्यालयीन युवकाला धमकावण्यास सुरुवात केली, अशी माहिती चौकशीत उघड झाली.

हेही वाचा – कधीकाळी वादग्रस्त असलेला विभाग आता ‘आयएसओ’ मानांकित; यवतमाळचा पुरवठा विभाग राज्यासाठी ठरला ‘मॉडेल’

वडिलांनी सोंडकरचा मोबाईल क्रमांक बंद (ब्लाॅक) केला. त्यानंतर सोंडकरने व्यावसायिकाच्या दुकानातील कामगारांना दूरध्वनी करण्यास सुरुवात केली. व्यावसायिकाने डेक्कन पाेलीस ठाण्यात तक्रार दिली. सोंडकर याच्या विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.