युक्रेन आणि रशियात युद्ध सुरू आहे. दोन्ही देश एक पाऊल पाठीमागे घेण्यास तयार नाहीत. तर, रशिया युक्रेनमध्ये पाय पसरत आहे. अशा परिस्थितीमध्ये भारतातील हजारो विद्यार्थी त्या ठिकाणी अडकले आहेत. आपली मुलगी सुखरूप परत यावी, यासाठी लोणावळा येथील मीनल आणि मारुती दाभाडे यांनी देव पाण्यात ठेवले आहेत. सरकारला आवाहन करताना दोघांना ही अश्रू अनावर झाले आहेत. मोनिकाचं मे महिन्यात वैद्यकीय शिक्षण पूर्ण होऊन ती भारतात परतणार होती. परंतु, त्या अगोदरच युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरू झालं आहे. 

मोनिका मारुती दाभाडे ही युक्रेनमध्ये गेली सहा वर्षे झालं MBBS च शिक्षण घेतेय. मे महिन्यात तीच शिक्षण पूर्ण होऊन ती मायदेशात परतणार होती. तोच, युक्रेन आणि रशीयामधील तणाव वाढला आणि युद्ध सुरू झालं. मोनिकाचे वडील मारुती दाभाडे यांनी सरकारला विनंती केली असून मुलीसह इतर मुलांना लवकर भारतात आणा, असे आवाहन केले आहे. ती युक्रेनमधील ओडिसा येथे अडकली असून त्यांच्याकडे खाद्यपदार्थ घेण्यासाठी पैसे देखील नाहीत, असं सांगत असताना मारुती दाभाडे यांना अश्रू अनावर झाले. 

युक्रेनमध्ये पुण्यातील ७७ विद्यार्थी अडकले

युद्धजन्य परिस्थिती असल्याने कधी काय होईल हे सांगता येत नाही. अस त्यांचं म्हणणं आहे. तर, आई मीनल म्हणाल्या की, “मुलगी लवकर परत यावी आम्हाला तिची काळजी वाटत आहे. त्यांच्याकडे पैसे देखील नाहीत. ते राहणार कसे” असं म्हणताना त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. मुलगी मोनिका आणि इतर मुलं सुखरूप भारतात परत यावेत, म्हणून मोनिकाच्या आई वडिलांच्या देव पाण्यात ठेवले आहेत. 

Story img Loader