दक्षिण कोकणात पाऊस जोर धरण्याची शक्यता
पुणे : नैर्ऋत्य मोसमी पावसाने आता विदर्भाकडे वाटचाल सुरू केले आहे. येत्या दोन दिवसांत विदर्भातील काही भागांत मोसमी पाऊस दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. विदर्भाच्या काही भागात सध्या पूर्वमोसमी पाऊस होत आहे. राज्याच्या उर्वरित भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्याता कायम आहे. कोकणात मात्र दक्षिण भागात मोसमी पाऊस काही प्रमाणात जोर धरण्याची शक्यता आहे.
मोसमी पावसाने सोमवारी मध्य महाराष्ट्राचा जवळपास सर्व भाग व्यापून मराठवाड्याचा बहुतांश भागांत प्रवेश केला होता. सध्या मोसमी पावसाने निम्मा महाराष्ट्र व्यापला आहे. मोसमी पावसाच्या प्रवासाची प्रगती चांगली असली, तरी दाखल झालेल्या भागामध्ये पावसाचे प्रमाण मात्र कमी असल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी मोसमी पावसाने कोणतीही प्रगती केली नसली तरी येत्या दोन दिवसात तो विदर्भातील काही भागात दाखल होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा