पुणे : मोसमी वारे अखेर केरळमध्ये दाखल झाले. हवामान विभागाने आनंदाची ही माहिती दिली आहे. मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीस केरळमध्ये पोषक हवामान असल्याचे हवामान विभागाने काल, बुधवारी जाहीर केले होते. हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार मोसमी वारे आज, गुरुवारी केरळमध्ये दाखल झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अरबी समुद्र, बंगालाच्या उपसागरातही मोसमी वाऱ्याने आगेकूच केली आहे. केरळच्या बहुतेक भागासग तमिळनाडूमध्येही मोसमी वारे धडकले आहे. मोसमी वारे केरळमध्ये चार जून रोजी दाखल होण्याचा हवामान विभागाचा अंदाज होता. पण, अरबी समुद्रात दाखल झालेल्या मोसमी वाऱ्याच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण नव्हते. शिवाय बिपरजॉय चक्रीवादळामुळेही मोसमी वाऱ्यांची प्रगती संथ गतीने सुरू होती.

मिझोराममध्येही आनंद सरी

मोसमी वारे केरळ आणि तमिळनाडूत दाखल होत असतानाच मोसमी वाऱ्याच्या बंगालच्या उपसागरातील शाखेने ईशान्यत धडक दिली आहे. मिझोराममध्येही आनंद सरींचा शिडकाव सुरू झाला आहे.

दोन दिवसांत बंगाल, कर्नाटकमध्येही

मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीस पोषक हवामान असल्यामुळे पुढील ४८ तासांत मोसमी वारे लवकरच पूर्ण तमिळनाडू व्यापून कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यांत पोहचेल, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.