पुणे : Maharashtra Weather Forecast राज्यात उशिराने, पण दमदारपणे दाखल झालेल्या मोसमी पावसामुळे सर्वदूर हजेरी लावल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. पावसाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाची पेरणीपूर्व मशागतींसाठी आणि पेरणीसाठी लागणाऱ्या बियाणे, खते, औषधांच्या खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. संततधार सुरू राहिल्यास आगामी १५ दिवसांत पेरण्या उरकण्याचा अंदाज आहे.

साधारण १५ जूनपर्यंत मोसमी पाऊस राज्य व्यापून पुढे वाटचाल करतो. यंदा २५ जूनची वाट पाहावी लागली. त्यामुळे शेतीची पेरणीपूर्व आणि पेरणीची सर्व कामे खोळंबली होती. शनिवारी, रविवारी अपवादवगळता राज्यात सर्वदूर हलका पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पेरणीपूर्व मशागतीसाठी शेतशिवारात वर्दळ वाढली आहे. ज्या शेतकऱ्यांची उन्हाळी मशागती झाल्या आहेत, त्यांची पावले बियाणे, खते, औषधांच्या खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रांकडे वळत आहेत. संततधार पाऊस सुरू राहिल्यास शेतकरी घाई करून पुढील १५ दिवसांत पेरण्या उरकून घेतील, अशी स्थिती आहे.

maharashtra assembly election 2024 many agricultural work disrupted due to election campaigning
प्रचारामुळे शेतीकामे ठप्प! शेतमजुरी ३००; तर राजकीय पक्षांकडून जेवणासह ४०० रुपये
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Bad weather in Mumbai Measures against pollution Mumbai print news
मुंबईत निवडणुकीपर्यंत प्रदूषणाचा त्रास; मनुष्यबळाअभावी पालिकेची यंत्रणा हतबल
farmers anger continues in 70 constituencies over soybean msp
७० मतदारसंघांत सोयाबीन ‘रोष’
In Vashis APMC market vegetable prices dropped due to increased arrivals
आवक वाढल्याने भाज्यांच्या दरात घसरण
what is the reason that Sea fish became expensive
मासे परवडत नाहीत, मत्स्याहारींनी करायचे तरी काय?
Voters in Malabar Hill insist on environment conservation in the wake of assembly elections 2024 mumbai print news
मलबार हिलमधील मतदार पर्यावरण संवर्धनासाठी आग्रही
Onion garlic became expensive while the prices of cotton soybeans decreased
ग्राहक, शेतकरी चिंतेत; कांदा, लसूण महागले तर कापूस, सोयाबीनचे दर पडल्याने नाराजी

हेही वाचा >>> राज्यात पाच दिवस बरसणार जलधारा!…‘या’ भागात होणार संततधार

पश्चिम महाराष्ट्रात मशागतींना वेग

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे, नगर जिल्ह्यांत दोन दिवस चांगला पाऊस झाला आहे. सातारा, सांगली जिल्ह्यांच्या सह्याद्री घाटाच्या परिसरात पाऊस सुरू आहे. पण, पूर्व भागात पाऊस सुरू नाही. माणदेशसह सोलापूर जिल्ह्याला अद्याप चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. दोन दिवस झालेल्या पावसामुळे पेरणीपूर्व मशागतींना वेग आला आहे. हलक्या जमिनीत मशागती सुरू झाल्या आहेत. काळ्या कसदार जमिनीत मशागतीसाठीही आणखी पावसाची गरज आहे. शेतकरी पेरणीयोग्य पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

उत्तर महाराष्ट्रात आशा पल्लवित

उत्तर महाराष्ट्रात काही भागात रिमझिम स्वरूपात पावसाचे आगमन झाले आहे. अन्यत्र अद्याप प्रतीक्षा आहे. आकाशात काळे ढग दाटल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पेरणीयोग्य पाऊस नसल्याने शेतशिवारात शांतता आहे. जळगावमध्ये काहींनी पावसाची वाट न बघता कपाशी, मका व इतर कडधान्यांची धूळपेरणी सुरू केली आहे. नाशिक जिल्ह्यात मागील २४ तासांत १०.८ मिमी पावसाची नोंद झाली. येवला, निफाड, चांदवड, मालेगाव, त्र्यंबकेश्वर तालुक्यांत पाऊस झाला. शेती कामे आणि पेरणीसाठी दमदार पावसाची गरज आहे. खान्देशात वेगळी स्थिती नाही. शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन, जेमतेम पाण्यावर कपाशीसह मक्याची लागवड केली आहे. विहिरींचीही पातळी खोल गेली आहे. लहान धरणे, पाझर तलाव कोरडेठाक असून, मोठ्या धरणाची पातळी ओसरत आहे.

हेही वाचा >>> पुण्यात पहिल्याच पावसात पावसाळापूर्व कामांवर ‘पाणी’; महापालिकेचा कारभार चव्हाट्यावर

मराठवाड्यात बियाणे खरेदीची लगबग

मराठवाड्याला शनिवारी, रविवारी झालेल्या पावसाने मोठा दिलासा दिला. काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे. अद्याप पुरेसा पाऊस नसल्याने पेरणीला सुरुवात झालेली नाही. मात्र, बियाणे बाजारात गर्दी दिसत आहे. पुढील चार दिवस पावसाचा अंदाज असल्याने मोठ्या पावसाची सर्वत्र प्रतीक्षा आहे. शनिवारी रात्री मराठवाड्यातील आठ महसूल मंडळांत अतिवृष्टी नोंदविण्यात आली. मात्र, अद्यापि सर्वदूर पाऊस झालेला नाही.

विदर्भात पेरणी योग्य पावसाची प्रतीक्षा

विदर्भात मोसमी पावसाचे आगमन झाले असले, तरी पेरणीसाठी आवश्यक ओलावा जमिनीत निर्माण न झाल्याने शेतकऱ्यांना आणखी काही दिवस पेरणीसाठी थांबावे लागणार आहे. जोपर्यंत शंभर मिलीमीटर पावसाची नोंद होऊन जमिनीत पुरेशी ओल तयार होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असा सल्ला कृषी खात्याने दिला आहे. दोन दिवसांपूर्वी विदर्भात मोसमी पाऊस दाखल झाला, काही ठिकाणी पावसाच्या सरीही आल्या. पण दुसऱ्याच दिवशी त्याने उसंतही घेतली. २५ जूनपर्यंत नागपूर विभागात २५.७ मिमी तर अमरावती विभागात केवळ २६.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अद्याप पेरण्यांना सुरुवात केली नाही. ओलिताची सोय आहे, त्यांनी मर्यादित स्वरूपात पेरण्या केल्या आहेत. पुरेसा पाऊस न झाल्याने गावागावांमध्ये पेरण्यांची लगबग दिसत नाही.

राज्याचा खरीप हंगाम असा

राज्यात खरीप हंगामात १५१ लाख हेक्टरवर पेरणी होते. सरासरी तृणधान्यांची पेरणी ३४, कडधान्यांची पेरणी २१, तेलबियांची ४३, कापसाची ४२ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी होते. उसाची लागवड सुमारे ११ लाख हेक्टरच्या घरात असते. २५ जूनअखेर राज्यात सरासरी १० टक्क्यांहून कमी क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

देशात २३ जूनअखेर झालेल्या पेरण्या (लाख हेक्टर)

भात १०.७७, तूर ०.६२, उडीद ०.५५, मूग ३.८३, कुळीथ ०.०६, अन्य डाळी १.४९, ज्वारी ०.३१, बाजरी ९.८१, नाचणी ०.२६, अन्य तृणधान्ये ०.४९, भुईमूग ७.६८, सोयाबीन ०.९९, सूर्यफूल ०.२६, तीळ ०.२२, अन्य तेलबिया ०.०३, ऊस ५०.७६, कापूस २८.०२ अशी २३ जूनअखेर १२९.५३ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. मागील वर्षी या काळात १३५.६४ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. देशात खरीप हंगामातील एकूण क्षेत्र १००० लाख हेक्टर (१० कोटी हेक्टर) क्षेत्र आहे.