पुणे : हवामान विभागाने विदर्भात मोसमी पाऊस दाखल झाल्याचे जाहीर केले आहे. शुक्रवारी विदर्भासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगाणा आणि छत्तीसगड राज्यात मोसमी वाऱ्यांनी आगेकूच केली आहे.हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर म्हणाले, शुक्रवारी विदर्भात मोसमी वारे दाखल झाले आहे. पुढील काही दिवस विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भासह तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये मोसमी वारे दाखल झाले असून, पुढील काही दिवसांत चांगला पाऊस अपेक्षित आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बंगालच्या उपसागरात चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून बाष्पयुक्त ढग ओदिशा, तेलंगाना, विदर्भ, रायपूर परिसरात जमा झाले आहेत. स्थानिक वातावरण आणि बाष्पयुक्त ढगांची दाटी झाल्याचा परिणाम म्हणून विदर्भासह संबंधित भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज, गुरुवारी हवामान विभागाने जाहीर केला होता. आज, शुक्रवारी थेट विदर्भात मोसमी वारे दाखल झाल्याचे हवामान विभागाने अधिकृतपणे जाहीर केले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Monsoon rains in vidarbha pune print news dbj 20 amy
Show comments