पुणे : बराच काळ प्रतीक्षा करायला लावल्यानंतर मोसमी वाऱ्यांनी मुंबई, पुण्यासह राज्य व्यापले आहे. मुंबई आणि पुण्यात आज मोसमी पाऊस सुरू झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे एकाच दिवसात मोसमी वाऱ्यांनी देशाचा मोठा प्रदेश व्यापला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यंदा एल-निनो हा घटक सक्रिय झाला आहे. तसेच जूनच्या पहिल्या आठवड्यात अरबी समुद्रात बिपरजॉय या चक्रीवादळाची निर्मिती झाली. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत आठ दिवस विलंबाने ८ जूनला मोसमी वारे केरळात दाखल झाले. त्यानंतर कोकणात पोहोचलेल्या मोसमी वाऱ्यांसाठी अनुकुल परिस्थिती असूनही मोसमी वाऱ्यांची फारशी प्रगती झाली नाही. त्यामुळे मुंबई, पुण्यासह उर्वरित महाराष्ट्राला पावसाची प्रतीक्षा करावी लागत होती. शुक्रवारी मोसमी पाऊस विदर्भात दाखल झाला. तर शनिवारी मध्य महाराष्ट्र, पुणे, मुंबईत पाऊस सुरू झाला. बराच काळ प्रतीक्षा केल्यानंतर अखेरीस पाऊस सुरू झाल्याने दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा – मुंढव्यातील कोयता गँगवर मोक्का कारवाई

हवामानशास्त्र विभागाच्या पुणे वेधशाळेचे शास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोसमी वाऱ्यांनी मुंबई, पुण्यासह संपूर्ण राज्य व्यापले आहे. त्यामुळे मुंबई आणि पुण्यात मोसमी पाऊस सुरू झाला आहे. विशेष म्हणजे, एकाच दिवसात मोसमी वाऱ्यांनी देशाचा मोठा प्रदेश व्यापला आहे.

हेही वाचा – VIDEO: गोष्ट पुण्याची – जगाच्या नकाशावर पुण्याचं भौगोलिक स्थान दर्शवणारा ‘शून्य मैलाचा दगड’

दरम्यान पुणे आणि परिसरातील गेल्या चोवीस तासांत पडलेल्या पावसाचा आढावा घेतला असता लोणावळा येथे सर्वाधिक ६१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यानंतर गिरीवन येथे ४२ मिलीमीटर, लवासा येथे ३४.५ मिलीमीटर, एनडीए येथे २९ मिलीमीटर, बारामती येथे २६.६ मिलीमीटर पाऊस पडला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Monsoon rains started in mumbai pune covering a large part of the country in a single day pune print news ccp 14 ssb