मान्सूनने अखेर शुक्रवारी केरळची किनारपट्टी गाठली असून, पुढच्या दोन दिवसांत तो राज्याच्या उंबरठय़ावर येऊन थडकण्याची शक्यता आहे. मात्र, अरबी समुद्रात पुढील दोन-तीन दिवसांत काय घडते यावर त्याचा महाराष्ट्र-प्रवेश अवलंबून असेल.
केरळात दमदार पाऊसही झाला. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मान्सून पुढे सरकला असून दोन दिवसांत तो कर्नाटकात थडकण्याची शक्यता आहे.
दरम्यान, तापमान वाढले असल्याने मुंबईसह कोकण किनारपट्टी आणि इतरत्र उकाडय़ाने लोक हैराण आहेत. विदर्भात बहुतांश ठिकाणी पारा ४५ अंशांच्या वर पोहोचला आहे. नागपुरात ४६.७, चंद्रपुरात ४७.१ आणि ब्रह्मपुरीत ४७.५ अंश सेल्सिअस तापमान शुक्रवारी नोंदवले गेले.