पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे महाराष्ट्रातून दिवाळीपूर्वीच माघारी जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या दक्षिणेकडून अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पामुळे राज्यात पाऊस कायम असून, मोसमी पावसाच्या परतीच्या प्रवासाला त्याचा अडथळा निर्माण होतो आहे. याच स्थितीमुळे पुढील दोन-तीन दिवस मुंबई परिसरासह कोकण विभाग, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही भागांत पाऊस होणार आहे. विदर्भात मात्र बहुतांश भागांत हवामान कोरडे राहणार आहे.

हेही वाचा >>> पुण्यात सकाळपासून पावसाची रिपरिप; शाळेला जाणाऱ्या मुलांची, पालकांची उडाली तारांबळ

House collapse in dangerous Kazigadi area along Godavari in Nashik nashik
नाशिकमध्ये धोकादायक काझीगढीत घरांची पडझड; सुमारे १०० रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
low pressure belt, Bay of Bengal,
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, हवामान खात्याचा इशारा काय?
Imd predicts heavy rainfall in maharashtra from 3rd september due to low pressure formed in bay of bengal
राज्यात पावसाचा पुन्हा जोर ? जाणून घ्या, बंगालच्या उपसागरातील घडामोडी
PM Narendra Modi, Palghar, Traffic jam,
कोल्हापूर : पंतप्रधानांचा दौरा पालघरला; वाहतूक कोंडी पश्चिम महाराष्ट्रात
nar par girna link Project marathi news
नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्प मान्यतेतून मतांसाठी सिंचन
Panzara river, Dhule, bridges under water Dhule,
धुळे : पांझरा नदीच्या पुरामुळे धुळ्यात दोन पूल पाण्याखाली – नागरिकांना सतर्कतेचा इशारा
rajapur, Anuskura Ghat, Landslide in Anuskura Ghat, traffic disruption in anuskura ghat, landslide, Mumbai Goa highway, roadblock, Public Works Department, soil removal,
राजापूर : अणुस्कुरा घाटात दरड कोसळली वाहतूक ठप्प

महाराष्ट्रात १४ ऑक्टोबरला मोसमी वाऱ्यांनी परतीचा प्रवास सुरू केला आहे. सद्य:स्थितीत उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांतील मोसमी वारे माघारी फिरले असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. मोसमी वारे देशातून निघून जाण्याची सर्वसाधारण नियोजित तारीख १५ ऑक्टोबर आहे. याच सर्वसाधारण तारखेनुसार महाराष्ट्रातून १२-१३ ऑक्टोबरपर्यंत मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, यंदाही परतीचा प्रवास विलंबाने होतो आहे. सध्या दक्षिणेकडील भागांत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. अरबी समुद्रातून बाष्प राज्याकडे येत आहे. त्याचा परिणाम म्हणून राज्यात काही भागांत पाऊस होत असून, त्यातून परतीच्या प्रवासाला विलंब होतो आहे. मात्र, येत्या दोन दिवसांत विदर्भातील बहुतांश भाग आणि उर्वरित राज्यातील काही भागांतून मोसमी वारे माघारी जातील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

हेही वाचा >>> पुणे: भारतीय उपखंडात दोन कोटी लोकांची अन्न सुरक्षा धोक्यात?

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन-तीन दिवस विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश भाग वगळता उर्वरित महाराष्ट्रात कमी-अधिक प्रमाणात पाऊस राहणार आहे. कोकण विभागांत मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्रात पुणे, नगर, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली आणि मराठवाड्यात औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड, नांदेड, लातूर आदी जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा >>> अतिवृष्टी बाधित शेतकरी मदतीविना; प्रशासकीय असमन्वयाचा विदर्भातील शेतकऱ्यांना फटका

रात्रीच्या उकाड्यात वाढ

राज्याच्या बहुतांश भागात सध्या रात्री आकाशाची स्थिती ढगाळ राहात असल्याने किमान तापमानात वाढ होऊन रात्रीचा उकाडा वाढला आहे. राज्याच्या जवळपास सर्वच भागांत किमान तापमान सरासरीच्या पुढे आहे. केवळ नगर जिल्ह्याची रात्र सध्या महाबळेश्वरपेक्षा थंड आहे. नगरमध्ये सोमवारी राज्यातील नीचांकी १७.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. पश्चिम महाराष्ट्रात इतरत्र किमान तापमान २१ ते २२ अंशांवर आहे. मुंबईत २६.८, तर कोकणात २४ अंशांवर किमान तापमान आहे. मराठवाड्यात २० ते २२ अंश, तर विदर्भात २१ ते २४ अंशांदरम्यान किमान तापमान असून, या विभागात सरासरीच्या तुलनेत किमान सर्वाधिक वाढ झाली आहे.