पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयात आज 11 हजार 631 विद्यार्थ्यांनी सामूहिकपणे मनाच्या श्लोकांचं पठण करत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डकरता प्रयत्न केला. हजारो पुणेकरांना हा अनोखा कार्यक्रम अनुभवण्याची संधी मिळाली. पुणे शहर आणि उपनगरातील 64 शाळांचे विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते.

निनाद पुणे, ओरायन स्टुडिओज, समर्थ व्यासपीठ आणि द्वारका साऊंड यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. समर्थ व्यासपीठ पुणेचे डॉ.राम साठये यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी उपयुक्त निवडक 21 मनाचे श्लोक आणि पाठाची निर्मीती मनशक्ती संस्थेने केली. संगीतकार आशिष केसकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थ्यांनी 21 मनाचे श्लोक सादर केले. जागतिक विक्रमासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आणि संस्थांशी समन्वयक म्हणून मिलिंद वेर्लेकर यांनी काम पाहिले. यावेळी भगवे झेंडे हातात घेऊन विद्यार्थ्यांनी जय जय रघुवीर समर्थचा जयघोष केला. तसेच यावेळी पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यातील शहिदांना आदरांजली देखील अर्पण करण्यात आली.

Story img Loader