पुण्यातील देवाच्या आळंदीमध्ये डोळे येण्याची साथ आली आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये तब्बल १ हजार ६०० पेक्षा अधिक मुलांना याची लागण झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी उर्मिला शिंदे यांनी दिली आहे. ज्या शाळांमध्ये डोळ्यांची साथ जास्त पसरली आहे. अशा शाळांना सुट्टी देण्याचं आवाहन देखील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलं आहे. वातावरण बदलामुळे डोळ्यांची साथ आल्याचं सांगितलं जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुण्यातील आळंदीमध्ये शाळा आणि वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेण्यासाठी आलेल्या शिक्षण संस्थांमध्ये मुलांना डोळ्यांच्या साथीची लागण झाली आहे. सतत डोळ्यांची जळजळ होणे, डोळ्यातून घाण येणे, डोळ्यात पाणी येणे, डोळ्यांच्या पापण्या चिटकणे अशी लक्षणे डोळे येण्याची आहेत. डोळ्यांना हात लावल्यास स्वच्छ हात धुणे, डोळे आलेल्या व्यक्तीने किंवा मुलाने चष्मा घालून बाहेर पडावे, डॉक्टरांचा वेळीच योग्य सल्ला घेऊन उपचार करावेत, अशी खबरदारी घेतल्यास डोळ्याची साथ आपण रोखू शकतो असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: More than 1600 children infected in just three days due to eye infection in alandi kjp 91 amy
Show comments