लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : यंदा एक जून ते ३० सप्टेंबर, या चार महिन्यांत देशात सरासरीपेक्षा जास्त म्हणजे १०६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्यूंजय महापात्रा म्हणाले, जगभरातील स्थिती मोसमी पावसाला पोषक आहे. त्यामुळे सरासरीपेक्षा जास्त म्हणजे १०६ टक्के मोसमी पावसाचा अंदाज आहे.

प्रशांत महासागरातील एल-निनोची स्थिती सध्या सक्रिय आहे. जूनच्या सुरुवातीपर्यंत एल-निनो निष्क्रिय स्थितीत जाईल आणि ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये ला-निना सक्रिय होईल. हिंद महासागर द्विध्रुविता (इंडियन ओशन डायपोल, आयओडी) सध्या निष्क्रिय आहे. जूनच्या सुरुवातीस आयओडी सक्रिय होईल. युरोशियातील (युरोप आणि आशिया) बर्फाच्छादित क्षेत्र मार्च-एप्रिलमध्ये सरासरीपेक्षा कमी राहिले, ही सर्व स्थिती नैऋत्य मोसमी पावसासाठी पोषक आहे. त्यामुळे सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे.

आणखी वाचा-पिंपरी : विरोधी उमेदवाराचे आव्हान किती असेल? महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे म्हणाले, उमेदवार कोण…!

काही भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस

मध्य भारत, दक्षिण भारत, उत्तर भारतात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज असला तरीही, जम्मू-काश्मीर, लडाख, ईशान्य भारत. ओडिशा, छत्तीसगड, झारखंड आणि पश्चिम बंगालच्या काही भागात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नैऋत्य मोसमी पावसाचा सुधारित अंदाज जाहीर केला जाईल, त्यावेळी महिनानिहाय पावसाची शक्यता जाहीर केली जाईल, असे महापात्रा यांनी सांगितले.

ला-निना काळात सरासरीपेक्षा जास्त पाऊस

ला-निनाच्या काळात आजवर सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याचे निरीक्षण आहे. अपवाद वगळता ला-निना काळात नैऋत्य मोसमी पाऊस वेळेत केरळमध्ये दाखल होऊन, निर्धारीत वेळेत देशभरात पोहचतो, असेही महापात्रा म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: More than average rainfall this year know the weather forecast of monsoon rains pune print news dbj 20 mrj
Show comments