पुणे : पेन्शनरांचे शहर, सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाचे माहेरघर अशी पुण्याची वैशिष्ट्ये सांगितली जातात. निवृत्तीनंतर अनेकजण पुण्यात स्थायिक होण्याला पसंती देतात. मालमत्ता आणि सदनिका खरेदी-विक्री व्यवहारांमधूनही ही बाब वारंवार स्पष्ट झाली आहे. नोकरी, शिक्षणानिमित्त पुण्यात आलेले बहुतांशी नागरिक पुण्यातच स्थायिक होतात. नोकरी, व्यवसाय, शिक्षण, रोजगार अशा सर्वार्थाने सोयीचे असल्याने राज्यातील आणि देशभरातील नागरिकांचा पुण्याकडे ओढा असतो. पुण्याची हवा आल्हाददायक असल्याने ज्येष्ठ नागरिकांकडून पुण्याला पसंती मिळते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रपतीपदातून निवृत्त झाल्यानंतर प्रतिभाताई पाटील असो किंवा लष्करप्रमुख म्हणून सेवानिवृत्त झालेले अरुणकुमार वैद्य यांच्यासारख्या अनेक दिग्गजांना देखील पुण्याची भुरळ पडली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक शाखेने मतदारयादी मंगळवारी (२३ जानेवारी) जाहीर केली. त्यामध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात मिळून एकूण ५७५४ एवढे मतदार शतायुषी असल्याचे समोर आले आहे. राज्यात बहुदा पुणे जिल्ह्यातच शंभरीपार केलेले एवढे मतदार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

हेही वाचा : निवडणुकीपूर्वी सोलापुरात धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयोग?

दरम्यान, पुण्यात ६०-६९ वयोगटाचे ८,३९,८९३, ७०-७९ वयोगटाचे ४,८९,१८७, ८०-८९ वयोगटाचे १,९४,९११ ९०-९९ वयोगटाचे ४८,१२७, १००-१०९ वयोगटाचे ५७२२, ११०-११९ वयोगटाचे २२, तर १२० पेक्षा अधिक वयोगटाचे १० मतदार आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: More than five thousand voters of 100 plus years old pune print news psg 17 pbs
Show comments