पिंपरी- चिंचवड : स्मार्ट सिटी असलेल्या पिंपरी- चिंचवड शहरामध्ये अनेक रस्त्यांवर खड्डे पडल्याचं बघायला मिळत आहे. पावसाने महानगरपालिकेच्या प्रशासनाची पोलखोल केली असल्याचं बोललं जात आहे. शहरात २,३०० पेक्षा अधिक खड्डे असल्याची कबुली स्वतः शहर अभियंता मकरंद निकम यांनी दिली आहे. पावसाचे कारण देत तात्पुरते खड्डे बुजवण्याचं काम सुरू असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

पिंपरी- चिंचवड महानगरपालिका आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाने अनोखं आंदोलन करत रस्त्यावरील खड्ड्यात फुलांचं रोपण केलं. आंदोलनात अजित गव्हाणे यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. या आंदोलनाच्या माध्यमातून पालिका प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला.

dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
maharashtra assembly election 2024 traffic diversions in pune city on occasion of pm modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहरात वाहतूक बदल; स. प. महाविद्यालय परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद
Khed Parshuram Ghat accident, Khed Parshuram Ghat,
खेड परशुराम घाटात दाट धुक्यामुळे चार वाहनांचा विचित्र अपघात; वाहनांचे मोठे नुकसान तर जीवितहानी टळली
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
washim assembly constituency dispute within mahayuti
महायुतीमध्ये असंतोषाची दरी, बंडखोरीमुळे वाशीम जिल्ह्यात वाद वाढले; कारवाईत पक्षपातीपणा?

आणखी वाचा-Uddhav Thackeray : “आता शाखांच्या फलकांवरील धनुष्यबाण हटवा अन्…”, उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश!

स्मार्ट आणि मेट्रो सिटी म्हणून पिंपरी- चिंचवड शहराची ओळख आहे. परंतु, या शहराच्या हद्दीतील काही भागांमध्ये आजही खड्डे दिसत आहेत. मुसळधार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी महानगरपालिका प्रशासनाची पोलखोल केली आहे. रस्त्यांवरील डांबर उखडलं आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने पाणी साचलं आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. हेच लक्षात घेऊन पिंपरी- चिंचवड शहराच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अजित गव्हाणे यांनी एक अनोखं आंदोलन केलं.

खड्ड्यात फुलांच रोपण करून आंदोलन करत पालिका प्रशासनाला आणि सत्ताधाऱ्यांना इशारा दिला आहे. अनेक वाहन चालकांना पाठीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने तात्काळ पावलं उचलावीत असं आवाहन अजित गव्हाणे यांनी महानगरपालिकेला केलेलं आहे. शहरातील ८० टक्के खड्डे बुजवले असल्याचं सांगत, ४०० ते ५०० खड्डे लवकरच बजवण्यात येतील असं शहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितलं.