पिंपरी: श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी सोहळा १७ ते २१ डिसेंबर २०२४ या कालावधीत चिंचवड येथे साजरा होणार आहे. सोहळ्यादरम्यान धार्मिक कार्यक्रम व उपशास्त्रीय व सुगम संगीत, तसेच व्याख्यानासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्याचे यंदाचे ४६३ वे वर्ष आहे. याबाबतची माहिती ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
चिंचवड देवस्थान ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि चिंचवड ग्रामस्थांच्या वतीने आयोजित महोत्सवाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या शुभहस्ते १७ डिसेंबरला सायंकाळी पाच वाजता होणार आहे. महोत्सवानिमित्त १७ ते २१ डिसेंबर या कालावधीत रोज सकाळी सहा वाजता नितीन दैठणकर यांचे समाधी मंदिर येथे व श्री तुकाराम दैठणकर यांचे श्रीमंगलमूर्ती वाडा येथे सनई-चौघडा वादन होईल. मोरया गोसावी महाराज चरित्र पठण, वेदमूर्ती श्री रबडे गुरुजी यांचा लक्ष्मी-नारायण याग होईल. १७ डिसेंबर रोजी सोहळ्याच्या उद्घाटननंतर अपर्णा कुलकर्णी यांचे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. रात्री साडेआठ वाजता पंडित संजीव अभ्यंकर यांचा ‘स्वरसंजीवन’ हा गायनाचा कार्यक्रम होईल. १८ डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजता शरदबुवा घाग यांचे कीर्तन, सायंकाळी सहा वाजता महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांनी रचलेल्या पदांवर आधारित ‘माझ्या मोरयाचा धर्म जागो’ हा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर पंडित जयतीर्थ मेवूंडी व सहकलाकार यांचा ‘भक्ती संगीत व अभंगवाणीचा’ कार्यक्रम होईल.
हेही वाचा >>>“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हा जातीय तणाव निर्माण करण्याचं षड्यंत्र…”- अमर साबळे
तर, १९ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता अविनाश धर्माधिकारी यांचे ‘टिळक पर्व’ या विषयावर व्याख्यान होईल. आहे. रात्री साडे आठ वाजता बेला शेंडे व सहकलाकार, सुगम संगीताचा कार्यक्रम सादर करणार आहेत. २० डिसेंबर रोजी आरोग्य व रक्तदान शिबिर होईल. सायंकाळी पं.शाहीद परवेझ- सतार, पं.राजस उपाध्ये-व्हायोलीन, पं.विजय घाटे- तबला यांचा कार्यक्रम होईल. २१ डिसेंबर रोजी पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे संजीवन समाधी सोहळ्याचे कीर्तन होईल. त्यानंतर महाप्रसादाने सोहळ्याची सांगता होईल, असे मंदार महाराज देव यांनी सांगितले.
हेही वाचा >>>इंदापूर-करमाळा ऋणानुबंध पुन्हा जुळणार; शिरसोडी-कुगाव पुलाच्या कामाला सुरुवात
डॉ. रघुनाथ माशेलकर यांना जीवन गौरव पुरस्कार
यंदाचा श्री मोरया गोसावी महाराज जीवन गौरव पुरस्कार पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांना जाहीर करण्यात आला आहे. २० डिसेंबर रोजी पंडितप्रवर गणेश्वरशास्त्री द्राविड यांच्या हस्ते डॉ. माशेलकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
संगीत आविष्कार
सोहळ्या दरम्यान पंडित संजीव अभ्यंकर, पंडित जयतीर्थ मेवूंडी, बेला शेंडे, शाहीद परवेझ, पं.राजस उपाध्ये, पं.विजय घाटे यांचा संगीत आविष्कार घडणार आहे.
चिंचवड देवस्थानच्या शेकडो एकर जागेवर ताबे मारले आहेत. याबाबत पन्नासहून अधिक प्रकरणांची सुनावणी धर्मादाय आयुक्तालाकडे सुरू असल्याचे चिंचवड देवस्थानचे विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप यांनी सांगितले.