पिंपरी : महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून डेंग्यू प्रतिबंधासाठी केलेल्या कंटेनर सर्वेक्षणात एक हजार ४२५ घरांमध्ये डास अळ्या आढळून आल्या आहेत. डासोत्पत्ती स्थानके आढळून आलेल्या २८७ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या असून. पाच जणांकडून ५२ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
आरोग्य विभागाने १ जून ते ८ जुलै या कालावधीत हे कंटेनर सर्वेक्षण केले. एक लाख २ हजार ४४७ घरांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एक हजार ४२५ घरांमध्ये डास अळ्या आढळून आल्या. तसेच, २७३ कायमची डासोत्पती स्थानके आढळली. तर, ४९४ तात्पुरत्या स्वरुपातील डासोत्पत्ती स्थानके आढळली. एक हजार ७२ कंटेनर रिकामे करण्यात आले. शहरात औषध फवारणी सुरू करण्यात आल्याचे आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे यांनी सांगितले.