पुणे : पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहोळ्यास उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार असून त्यापूर्वी त्यांनी रुबी हॉल क्लिनिक ते वनाजपर्यंत मेट्रोने प्रवास केला. तुम्ही आजपर्यंत मेट्रोने किती वेळा प्रवास केला. कुठे काम करता, अशी विचारपूस एका महिला प्रवाशाला अजित पवार यांनी केली. त्यावर ती महिला म्हणाली की, मी एका ऑफिसमध्ये काम करते. पण दादा मेट्रो स्टेशनवर सर्वाधिक बिहारी लोक काम करताना दिसत आहेत, अशी तक्रार महिलेने अजित पवार यांच्याकडे केली.
हे खरं आहे का? आपण कोणताही प्रकल्प करताना स्थानिक तरुणांना संधी देतो. जर स्थानिकांना संधी दिली नाही, तर त्यांच्यामध्ये रोष पाहण्यास मिळतो, अशा शब्दात अजित पवार यांनी महामेट्रोचे सीईओ श्रावण हर्डीकर यांना सुनावले. पण त्यावर श्रावण हर्डीकर यांना कोणत्याही प्रकारचे उत्तर देता आले नाही.
हेही वाचा – राज्यात पुढील सहा दिवस पावसाची उघडीप, हवामान विभागाचा अंदाज
हेही वाचा – पुणे : सिंहगड रस्त्यावर कोयता गँगची दहशत; तरुणावर हल्ला
पुणे शहराचे पश्चिमद्वार म्हणून चांदणी चौकाची ओळख आहे. त्या चौकामध्ये प्रवाशांना अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते. त्या वाहतूक कोंडीमधून प्रवाशांची सुटका करण्यासाठी सुसज्ज असा रस्ता आणि उड्डाणपुलाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे.