पावसाळ्याला सुरुवात होताच शहरात कीटकजन्य आजारांचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली आहे. पुणे शहरात डेंग्यूच्या रुग्णांचे प्रमाण काही दिवसांपासून वाढताना दिसत आहे. जुलै महिन्यात शहरात ५२ रुग्णांना डेंग्यूचे निदान झाले आहे. जानेवारी ते जुलै २०२२ या काळातील रुग्णांची संख्या १८५ एवढी असून त्यांपैकी सर्वाधिक रुग्ण नगर रस्ता-वडगाव शेरी, औंध-बाणेर, हडपसर-मुंढवा, टिळक रस्ता-सिंहगड रस्ता आणि कसबा-विश्रामबाग या पाच प्रभागांमध्ये आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. मे आणि जून महिन्यात शहरातील पावसाचे प्रमाण कमी राहिले. त्यामुळे त्या दोन महिन्यांत डेंग्यूच्या रुग्णांचे प्रमाण कमी राहिले. मे महिन्यात १८ तर जूनमध्ये १७ रुग्णांना डेंग्यूचे निदान झाले. पावसामुळे आता जागोजागी पाणी साचण्याच्या घटना वाढत आहेत. त्याचा स्वाभाविक परिणाम डेंग्यूच्या रुग्णसंख्येवरही दिसून येत आहे. जुलै महिन्यात ५५७ संशयित रुग्ण आढळले. त्यांपैकी ५२ रुग्णांना डेंग्यू संसर्ग झाल्याचे निदान झाले असल्याचे आरोग्य विभागाच्या माहितीवरून समोर आले आहे. जानेवारी ते जुलै या कालावधीत नगर रस्ता वडगाव शेरी प्रभागात ३१ तर औंध बाणेर प्रभागात ३० रुग्ण आढळले आहेत. हडपसर-मुंढवा प्रभागात २९, टिळक रस्ता-सिंहगड रस्ता प्रभागात २२ आणि कसबा-विश्रामबाग प्रभागात ११ रुग्णांना डेंग्यूचे निदान झाले आहे. डेंग्यूचे डास प्रामुख्याने स्वच्छ पाण्यात होत असल्याने घर आणि परिसरात पाणी साचू न देण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.
काय काळजी घ्यावी?

  • पाणी साचू देऊ नका.
  • डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करा.
  • बागेतील कुंड्या, अडगळीचे सामान, टायर यात पाणी साचणार नाही याची काळजी घ्या.
  • ताप, अंगदुखी, डोकेदुखी, अंगावर लालसर चट्टे अशी लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.