पुणे : मुंबई विभागात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते मशीद रोड स्थानकादरम्यानचा कॅरनाक पूल पाडण्याच्या कामासाठी रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे २० नोव्हेंबरला पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या बहुतांश गाड्या रद्द करण्यात येणार असून, पुणे विभागातून जाणाऱ्या इतर लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही परिणाम होणार आहे. १९ आणि २१ नोव्हेंबरलाही पुणे विभागातील वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत असणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पूल पाडण्याचे काम १९ नोव्हेंबरला रात्री करण्यात येणार आहे. परिणामी १९ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत विविध गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. काही गाड्या अंशत: रद्द करण्यात येणार आहेत. या कालावधीत लांब पल्ल्याच्या विविध गाड्या पुणे स्थानकापर्यंतच धावणार आहेत. २० नोव्हेंबरला मात्र पुणे विभागातील आणि पुणे ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या बहुतांश गाड्या रद्द केल्या जाणार आहेत.

हेही वाचा: पुणे: वैद्यकीय महाविद्यालय उभारणीची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात

  • १९ नोव्हेंबरला पुणे विभागातील रद्द गाड्या : पुणे-मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस, हैदराबाद-मुंबई हुसैन सागर एक्स्प्रेस, कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस.
  • २० नोव्हेंबरला पुणे-मुंबई दरम्यानच्या रद्द गाड्या : पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस, मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस, मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेस, मुंबई-पुणे प्रगती एक्स्प्रेस, मुंबई-पुणे डेक्कन क्वीन, पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेस, पुणे-मुंबई डेक्कन क्वीन, पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेस, पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस, पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेस. मुंबई-हैदराबाद हुसैन सागर एक्स्प्रेस.
  • २० नोव्हेंबरला दादरवरून सुटणाऱ्या गाड्या : मुंबई-चेन्नई एक्स्प्रेस (१९ नोव्हेंबर), मुंबई-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस, मुंबई-भुवनेश्वर कोणार्क एक्स्प्रेस, मुंबई-हैदराबाद एक्स्प्रेस, मुंबई-चेन्नई एग्मोर एक्स्प्रेस.
  • २० नोव्हेंबरला पुण्याहून सुटणाऱ्या गाड्या : मुंबई-बंगळुरु उद्यान एक्स्प्रेस, मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस, मुंबई-तिरुवनंतपुरम एक्स्प्रेस, मुंबई-गदग एक्स्प्रेस, मुंबई-सोलापूर सिद्धेश्वर एक्स्प्रेस.
  • १९ नोव्हेंबरला दादरवरून सुटणाऱ्या गाड्या : पुणे-मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेस, चेन्नई-सेंट्रल-मुंबई एक्स्प्रेस, बिदर-मुंबई एक्स्प्रेस, हैदराबाद-मुंबई एक्स्प्रेस. (२० नोव्हेंबरला पुणे-मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेस दादरपर्यंतच धावेल)
  • १९ नोव्हेंबरला पुण्यापर्यंतच धावणाऱ्या गाड्या : गदग-मुंबई एक्स्प्रेस, सोलापूर-मुंबई सिद्धेश्वर एक्स्प्रेस, तिरुवनंतपुरम-मुंबई एक्स्प्रेस, बंगळुरु-मुंबई उद्यान एक्स्प्रेस, कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस (२० नोव्हेंबर).
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Most of the trains on the pune mumbai route will be canceled tomorrow pune print news tmb 01