पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गेल्या दोन वर्षांमधील अपघातांमध्ये सर्वाधिक मृत्यू तरुणांचेच झाले असून, हे प्रमाण ४० टक्क्य़ांपेक्षा जास्त आहे. विशेष म्हणजे प्राणंकित अपघात करणाऱ्या आरोपींमध्येही तरुणांचीच संख्या सर्वाधिक आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड भागात २०१२ मध्ये एकूण ३८८ प्राणंतिक अपघात झाले. त्यामध्ये ३३५ पुरुष आणि ७२ महिला मिळून ४०७ जणांचा मृत्यू झाला. यापैकी १८ ते ३५ वयोगटातील तरुणांची संख्या १८९ आहे. तर, ३५ वर्षांच्या पुढच्या १७७ जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे. या मृतांपैकी २०८ जण दुचाकीवर होते, तर १२३ पादचारी होते. त्याच बरोबर प्राणंकित अपघात करणाऱ्यांमध्येही तरुणांची संख्या सर्वाधिक (१३०) आहे.
या वर्षी ऑक्टोबरअखेर ३२८ प्राणंतिक अपघात झाले आहेत. त्यामध्ये ३३६ जणांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्यांमध्ये १८ ते ३५ वयोगटातील १४२ तरुणांचा मृत्यू झाला आहे. तर, अपघात करणाऱ्यांमध्ये याच वयोगटातील १०१ तरुणांवर गुन्हे दाखल आहेत.
याबाबत वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी सांगितले की, शहरात अपघातांमध्ये मृत्यू होणाऱ्यांमध्ये व अपघात करणाऱ्यांमध्ये तरुण सर्वाधिक आहेत. कारण, या वयोगटातच सर्वाधिक व्यक्ती वाहने चालवितात. या वयोगटातील वाहन चालविताना काळजी घेत नाहीत, वेगाने वाहने चालवितात. त्यामुळे अपघात करणारे आणि मृत्यू होणाऱ्यांमध्ये तरुणांची संख्या अधिक आहे.
याबाबत पेडेस्ट्रीयन फर्स्ट संस्थेचे प्रशांत इनामदार यांनी सांगितले की, या वयोगटात मी पुढे गेलो पाहिजे ही वृत्ती जास्त आहे. त्यांच्याकडून नियमांकडे दुर्लक्ष होते. वाहन चालविताना मोबाईलचा वापर करतात, त्यावर गाणी तरुण ऐकतात. तसेच, अतिवेगाने वाहने चालविणेसुध्दा याच वयोगटातील आहे. त्यामुळे हे घडते. आपल्याकडे वाहतूक शिक्षणाचा अभाव आहे. ते शाळेपासून देणे गरजेचे आहे. तरुणांची मानसिकता बदलण्यासाठी त्यांना लहानपणापासूनच वाहतूक शिक्षण देणे गरजेचे आहे.
पुण्यात अपघातांमध्ये सर्वाधिक मृत्यू तरुणांचे!
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गेल्या दोन वर्षांमधील अपघातांमध्ये सर्वाधिक मृत्यू तरुणांचेच ,तर प्राणंकित अपघात करणाऱ्या आरोपींमध्येही तरुणांचीच संख्या सर्वाधिक आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 27-11-2013 at 03:00 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Most of the youth dies in accident and most of youth makes accidents in pune