पिंपरी: गांजा विक्री करणाऱ्या आई आणि मुलाला पिंपरी- चिंचवडच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. दोघांकडून दोन किलो गांजा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत ५० हजार रुपये असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. संगीता निवृत्ती जेधे आणि अमर निवृत्ती जेधे अशी आरोपींची नावे आहेत. ते भोसरीतील लांडगे नगर या ठिकाणी भाड्याच्या खोलीत राहत होते तिथूनच पोलिसांनी हा गांजा जप्त केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार विजय दौंडकर व प्रसाद कलाटे यांना माहिती मिळाली की, भोसरीतील लांडगे नगर येथे किरायाच्या खोलीत राहत असलेल्या आई आणि मुलाकडे दोन किलो गांजा आहे. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी छापा मारून १ लाख ८६ हजार चा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याच्यामध्ये दोन किलो गांजा, ३६ हजार रुपये रोख रक्कम आणि एक आयफोन चा समावेश आहे. संबंधित आई आणि मुलगा किरकोळ स्वरूपात गांजा विक्री करत असल्याचं पोलीस तपासात उघड झाले आहे. संगीता निवृत्ती जेधेवर या अगोदर देखील अशाच प्रकारे कारवाई केलेली आहे. ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली असून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mother and son arrested for selling ganja kjp 91 mrj