पुणे : सिगारेट घेण्यासाठी आईने २० रुपये  न दिल्याने आईला मारहाण करणाऱ्या मुलाच्या विरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी माधव राजाराम कांबळे (वय २७) याच्याविरुद्ध  गुन्हा दाखल केला आहे.  याबाबत सखुबाई राजाराम कांबळे (वय ४५, रा. कोंढवा खुर्द) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  माधव काही कामधंदा करत नाही. त्याने आई  सखुबाई यांच्याकडे  सिगारेटसाठी २० रुपये मागितले. त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी त्याची भावाशी वादावादी झाली. सखुबाई यांनी भांडणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. माधवने आईच्या हातावर बांबू मारला. मारहाणीत आईचा हात फ्रॅक्चर झाला.

Bengaluru man kills son Over mobile
‘तू मेलास तरी फरक पडत नाही’, मोबाइलचं व्यसन जडलेल्या लहान मुलाचा वडिलांनीच केला निर्घृण खून
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Supreme Court on maternity leave
दत्तक मूल तीन महिन्यांपेक्षा मोठे असल्याने मातृत्व रजा नाकारली ; सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे मागितले उत्तर
Attack on police officer on patrol
मुंबई : गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला
Municipal corporation Thane, illegal hoarding holders Thane, illegal hoarding Thane,
ठाण्यात ५२ बेकायदा होर्डिंगधारकांना पालिकेच्या नोटीसा, १० कोटी ९६ लाखांचा दंड पालिका करणार वसूल
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……
Mumbai High Court Verdict On Marriage Cruelty.
सुनेला टीव्ही पाहू न देणे ही क्रूरता? मुंबई उच्च न्यायालयातील खटला २० वर्षांनी निकाली