अनैतिक संबंधात अडथळा ‌ठरणाऱ्या पोटच्या मुलीचा आईने तिच्या प्रियकराच्या मदतीने खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आईसह प्रियकराला खडकी पोलिसांनी अटक केली. समीक्षा संतोष गवई असे खून झालेल्या अडीच वर्षांच्या बालिकेचे नाव आहे. या प्रकरणी समीक्षाची आई लक्ष्मी (वय ३२, रा. अकोला) आणि प्रियकर संतोष देवमन जामनिक (वय ३१ रा. खिरपुरी बुद्रुक, ता. बाळापूर, जि. अकोला) यांना अटक करण्यात आली आहे. लक्ष्मीचा पती संतोष व्यसनी असल्याने तिची पतीशी पटत नव्हते. लक्ष्मीचे माहेर अकोला जिल्ह्यातील खिरपुरी गावात आहे. आरोपी संतोष या गावात राहत आहे. पतीशी पटत नसल्याने लक्ष्मी माहेर निघून आली होती. तिचे गावातील तरुण संतोष याच्याशी प्रेमसंबंध निर्माण झाले होते.

हेही वाचा >>> धायरीत टोळक्याची दहशत, तरुणाला जीवे मारण्याची धमकी

Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
life sentence prisoner escapes from yerawada jail pune
येरवड्यातील खुल्या कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा सुनावलेला कैदी पसार
23 year old woman drowned her one year old son in water tank in Washind area of ​​Bhiwandi
जन्मदात्या आईकडूनच मुलाची हत्या
Santosh Deshmukh Murder Case
“…म्हणून माझ्यावर ही वेळ आली का?” मयत सरपंच संतोष देशमुखांच्या आईचा टाहो; पत्नी म्हणाली, “ते १५ वर्षांपासून..”
Dismissed police officer killed woman with scarf over immoral relationship
नागपूर : अनैतिक संबंध! बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याने प्रेयसीचा गळा आवळला, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी…
young woman abandoned her newborn near Vanzra Layout Nagpur
अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळाला रस्त्यावर फेकले
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात

संतोष काही महिन्यांपूर्वी पुण्यात कामासाठी आला होता. आठवड्यापूर्वी लक्ष्मी अडीच वर्षांची मुलगी समीक्षा हिला घेऊन प्रियकर संतोषला भेटण्यासाठी पुण्यात पळून आली होती. लक्ष्मीने दोन मोठ्या मुली आणि मुलाला माहेरी ठेवले होते. संतोषबरोबर ती दापोडी परिसरात राहत होती. अनैतिक संबंधात अडीच वर्षांची मुलगी अडथळा ठरत असल्याने चार दिवसांपूर्वी लक्ष्मी आणि तिचा प्रियकर संतोष यांनी अडीच वर्षांची मुलगी समीक्षाचा खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह खडकी परिसरात टाकून दोघे जण पसार झाले होते.

हेही वाचा >>> पुणे : चंदन चोरट्याला पकडले चार गुन्हे उघड

या प्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत होता. गुन्हे शाखेचे युनिट चार आणि खडकी पोलिसांच्या पथकाने खडकी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले होते. सीसीटीव्ही चित्रीकरणाद्वारे पोलिसांनी तपास केला. तपासात मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी लक्ष्मी आणि तिचा प्रियकर संतोष यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

Story img Loader