आई आणि मुलाचे नाते या हे जगातले असे नाते आहे ज्यात वात्सल्य, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा या सगळ्या भावनांचा मिलाफ बघायला मिळतो. हे नाते फक्त माणसांमध्येच नाही तर प्राण्यांमध्येही तेवढेच जिव्हाळ्याचे असल्याचे दिसून येते. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील नागापूर गावामध्ये बिबट्याच्या बछड्याचं आईशी मिलाफ घडवण्यात यश आलं.
गावकऱ्यांना उसाच्या शेतात दोन महिन्याचा बछड्याचे पिल्लू सापडले होते. गावकऱ्यांनी या अनाथ बछड्याला वनविभागाकडे आणून दिलं. वनविभाग मंचर आणि माणिकडोह बिबट निवारा टीम यांनी हे पिल्लू काल रात्री जिथे सापडले तिथेच ठेवले. या लहान पिल्लाचा शोध मादी बिबट्या घेत असेल अशी खात्री वनविभागाला होती. त्यांमुळे अधिकाऱ्यांनी ही पिल्ले त्याच शेतात ठेवली होती.
त्यानंतर मादी बिबट्याआली आणि बछड्याला घेऊन गेली.
पिल्ले घेऊन जातानाचा तिचा व्हिडिओ कॅमेरात कैद झाला आहे. मुक्या प्राण्यांमधील आईचे वात्सल्य कसे असते हेच या व्हिडिओत पाहायला मिळते.