पुणे : पुण्यातील बिबवेवाडी भागात राहणार्या आईने तिच्या प्रियकराच्या मदतीने पोटच्या मुलीचे अश्लील व्हिडिओ तयार करून नातेवाईकांना व्हायरल केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपी आई भारती कुऱ्हाडे आणि आरोपी प्रियकर गुरुदेव कुमार स्वामी या दोन आरोपींना बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मागील पाच महिन्यापूर्वी १३ वर्षीय पीडित मुलीस आरोपी आई भारती कुऱ्हाडे आणि आरोपी प्रियकर गुरुदेव कुमार स्वामी या दोघांमध्ये अनैतिक संबंधाबाबत समजले. त्यानंतर याबाबत पीडित मुलीने त्यांच्या घर मालकीण यांना माहिती दिली. आमच्या दोघांच्या नात्याबाबत घर मालकीणीला का सांगितले, असे म्हणून पीडित मुलीला आई आणि तिचा प्रियकर सातत्याने त्रास देऊ लागले. त्याच दरम्यान गुरुदेव कुमार स्वामीने पीडित मुलीवर अत्याचार देखील केले. या सर्व घटनांचा आई भारती कुऱ्हाडे यांनी व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि सर्व अश्लील व्हिडिओ नातेवाईकांना शेअर केले. त्या घटनेनंतर पीडित मुलीने आमच्याकडे तक्रार दिली.
याबाबत दोन्ही आरोपींना माहिती होताच ते फरार झाले. या दोन्ही आरोपींचा शोध सुरू असताना, आरोपी आई भारती कुऱ्हाडे आणि प्रियकर गुरुदेव कुमार स्वामी हे खडकवासला नांदेड गाव येथील एका चाळीत राहत असल्याची माहीती मिळाली. त्या माहितीच्या आधारे सापळा रचून दोघा आरोपींना अटक करण्यात आली असून दोघाकडे अधिक चौकशी करण्यात येत असल्याचे सांगितले.