पुणे : मुदतपूर्व जन्म झालेल्या अथवा जन्मानंतर इतर काही तक्रार असल्यास बाळाला नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात (एनआयसीयू) ठेवले जाते. बाळासह संपूर्ण कुटुंबासाठी हा काळ कसोटीचा असतो. या काळात बाळाच्या बौद्धिक विकासासाठी आता ‘बेबीज विथ बुक्स’ ही संकल्पना रुग्णालयात राबविली जात आहे. आता पुण्यातील भारती रुग्णालयात ही मोहीम सुरू झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बाळाचा जन्म हा प्रत्येक कुटुंबासाठी आनंदाचा क्षण असतो. परंतु दुर्दैवाने काही माता सातव्या आठव्या महिन्यात बाळाला जन्म देतात. काही वेळा योग्य दिवस भरूनही बाळास काही शारीरिक अडचणी निर्माण होतात. अशा बाळांना ‘एनआयसीयू’मध्ये ठेवावे लागते. संपूर्ण कुटुंब आणि बाळासाठी हा काळ कसोटीचा असतो. सातव्या महिन्यात जन्म असेल तर दीड दोन महिने यात जातात. डॉक्टर आपल्या परीने प्रयत्न करीत असतात. अजूनही काही प्रयत्न करून बाळाचा भविष्यातील बौद्धिक विकासास विलंब होण्याचा धोका कमी करता येईल का, यासाठी जगभर प्रयत्न सुरू आहेत. त्यातील एक म्हणजे ‘द बेबीज विथ बुक्स’ ही संकल्पना आहे. ही संकल्पना भारती हॉस्पिटलमधील ‘एनआयसीयू’मध्ये राबवली जात आहे.

हेही वाचा…Independence Day 2024: उत्पादन शुल्क अधीक्षक चरणसिंह रजपूत यांना विशेष मोहिम पदक

बाळांच्या मेंदूच्या विकासामध्ये पालकांच्या आवाजाचा सकारात्मक परिणाम होतो हे सिद्ध झाले आहे. त्यातूनच बाळाच्या जवळ पुस्तक वाचन ही संकल्पना पुढे आली. भविष्यात भाषा आणि कौशल्ये सुधारण्यासाठी याचा उपयोग होतो. लहान मुलांच्या पुस्तकांचे इंद्रधनूचे रंग आणि पुस्तक वाचतानाचा आईचा लयबद्ध कमी जास्त होणारा आवाज मुलाचे लक्ष खेचून घेण्यात मदत करतो. त्यामुळे या अनोख्या संवादाचा परिणाम बाळाच्या मेंदूचा विकास वाढवतो. यामुळे बाळ लवकर बरे होण्यास मदत होते.

‘बेबीज विथ बुक्स’ संकल्पना राबवण्यासाठी विभागप्रमुख डॉ. प्रदीप सूर्यवंशी, लहान मुलांच्या फिजिओथेरपिस्ट डॉ. पूजा पडबिद्री, नवजात बालकांच्या तज्ज्ञ डॉ. नंदिनी मालशे, डॉ. सुप्रभा पटनाईक यांनी पुढाकार घेतला. या उपक्रमासाठी कोणाला पुस्तके दान करायची असतील तर भारती रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा…बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले… असं आमचं सरकार – अजित पवार

‘बेबीज विथ बुक्स’ संकल्पना रुजावी यासाठी जगभरात ९ ते १९ सप्टेंबर या काळात ‘रीड-ए-थॉन’ आठवडा साजरा केला जातो. ‘एनआयसीयू’मधील अनुभव सुधारण्यासाठी ही एक मैत्रीपूर्ण वाचन स्पर्धा आहे. यात भाग घेणारे भारती हॉस्पिटल हे देशातील पहिले रुग्णालय आहे. – डॉ. अस्मिता जगताप, प्रमुख, आरोग्य विज्ञान विभाग, भारती विद्यापीठ

हेही वाचा…पिंपरी : एकाच जागी अनेक वर्षे नेमणुकीस असलेल्या कर्मचाऱ्यांची लवकरच उचलबांगडी

वाचन कधी सुरू करावे किंवा कोणत्या प्रकारची पुस्तके लहान मुलांसाठी वाचावीत याबद्दल पालकांना भारती रुग्णालयाकडून मार्गदर्शन केले जाते. त्यासोबतच इतर अनेक उपक्रम राबवून बाळाच्या विकासात हातभार लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. – डॉ. संजय ललवाणी, वैद्यकीय संचालक, भारती रुग्णालय

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mothers to read books to newly born as babies with books concept cathes traction pune pune print news stj 05 psg