लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पुणे: खराडी बाह्यवळण मार्ग परिसरातून मोटार चोरून पसार झालेल्या एकाला चंदननगर पोलिसांनी अटक केली. रामेश्वर अर्जुन मिस्कीन (वय २६, रा. सरडेवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. याबाबत एकाने चंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
खराडी बाह्यवळण मार्ग परिसरातील सिग्नल दुरुस्तीचे काम तक्रारदाराच्या कंपनीकडे देण्यात आले होते. तक्रारदार आणि चार कामगार मोटारीतून तेथे आले होते. खराडी बाह्यवळण मार्ग परिसरात त्यांनी मोटार लावली होती. रात्री बाराच्या सुमारास सिग्नल दुरुस्तीचे काम करून ते आले. तेव्हा मोटार जागेवर नसल्याचे आढळून आले.
आणखी वाचा-बांधकाम व्यावसायिकाच्या बंगल्यातून दीड किलो सोन्याचे दागिने, दहा लाखांची रोकड लंपास
तक्रारदाराने मोटारीबाबत चौकशी केली. तेव्हा मोटार चोरीला गेल्याचे लक्षात आले. याबाबत तक्रारदाराने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी खराडी बाह्यवळण मार्ग परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले होते. चोरलेली मोटार खराडी भागातील एका रुग्णालयाजवळ असलेल्या पडक्या इमारतीच्या परिसरात लावण्यात आल्याची माहिती पोलीस कर्मचारी नामदेव गडदरे आणि प्रदीप घोडके यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने तेथे सापळा लावला. पोलिसांना पाहताच मोटार चोरटा मिस्कीन तेथून पळाला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, गुन्हे शाखेचे निरीक्षक जगन्नाथ जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रामेश्वर रेवले, नामदेव गडदरे, संतोष शिंदे, गजानन पवार, नितीन कांबळे, प्रदीप घोडके यांनी ही कारवाई केली.