लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे: पुणे नगर रस्त्यावर खराडीजवळ बीआरटी मार्गात पीएमपी बसला धडकून मोटारसायकलस्वार तरुण मृत्युमुखी पडला.

अभिषेक राजेंद्र माने (वय २१, रा. भाडळे रस्ता , वाघोली) असे मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे.  नगर रस्त्याकडून पुण्याकडे येणाऱ्या बीआरटी मार्गातून बस चालली होती. नियमाचे उल्लंघन करून अभिषेक मोटारसायकलवरून भरधाव वेगाने या मार्गातून चालला होता. खराडीजवळ तो बसला धडकला. स्थानिक नागरिकांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तो मरण पावला. वाघोली पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Motorcycle rider died after hitting pmp bus in pune print news rbk 25 dvr